आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एलबीटी यल्गार, एक एप्रिलला व्यापारपेठा बंद

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर - राज्यातील 22 महापालिका क्षेत्रात लागू झालेल्या स्थानिक संस्था कराच्या (एलबीटी) विरोधात 1 एप्रिलला राज्यव्यापी बंद पुकारण्यात आला आहे. त्यात सोलापूरच्या व्यापार्‍यांनी सहभागी होण्याचा निर्णय शुक्रवारी सायंकाळी झाला.

याबाबत चाटी गल्लीत बैठक झाली. तीत एकमुखाने व्यापारपेठा बंद ठेवण्याचे ठरले. इतर राज्यांमध्ये कुठेही ‘एलबीटी’ नाही. नाशिक, औरंगाबाद, सोलापूरच्या व्यापार्‍यांनी त्याच्या विरोधात उच्च न्यायालयात दाद मागितली. ही स्थिती असताना या कराचा फेरविचार अपेक्षित होता; तथापि तो राज्यभर लागू करण्याचा निर्णय शासनाने घेतला. त्याचा निषेध करण्यासाठी हा बंद असल्याचे व्यापारी महासंघाचे प्रमुख प्रभाकर वनकुद्रे यांनी सांगितले. पुणे चेंबर्सने शनिवारी राज्यातल्या सर्व व्यापारी संघांच्या प्रतिनिधींना बोलावले आहे. त्यासाठी वनकुद्रे यांच्यासह दहा व्यापारी पुण्याला रवाना झाले. या बैठकीसाठी सुकुमार चंकेश्वरा, दयासागर सालोटगी, राजू राठी, व्यंकटेश शेटे, माणिक गोयल, श्याम बियाणी, अरविंद चिंता, धवल शहा, पप्पू कंदले, हरी गुप्ता आदी उपस्थित होते.

ग्राहकांचे काय ? : एलबीच्या विरोधात यापूर्वी व्यापार्‍यांनी बेमूदत बंद पुकारला होता. त्यादरम्यान ग्राहकांचे हाल झाले होते. अनेक ठिकाणी चढय़ा दराने मालविक्री झाल्याचे पहायला मिळाले. आता व्यापार्‍यांनी पुन्हा बंदची हाक दिल्यामुळे ग्राहकांचे काय होणार हा प्रश्न पुढे येत आहे.