आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सत्ताधाऱ्यांचा असाही यू-टर्न, सभेत ४१ कामास मंजुरी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - माजीनगर अभियंता सुभाष सावस्कर यांच्या खातेनिहाय चौकशीची गरज नसल्याची भूमिका सत्ताधाऱ्यांनी घेतली. त्यास विरोधी पक्षांनी जोरदार हरकत घेतली. वादग्रस्त सावस्कर यांची चौकशी टाळण्याचा प्रयत्न विरोधकांनी हाणून पाडला. महापालिकेच्या सोमवारच्या सभेत सावस्कर यांच्या चौकशीसाठी प्राधिकरण म्हणून आयुक्तांच्या नियुक्तीचा ठराव आला. तो आता फेरसादर होणार आहे.
चौकशीसाठी आयुक्तांना प्राधिकरण म्हणून नेमण्यासाठी सभागृहाची मान्यता आवश्यक असते. त्यामुळे प्रशासनाने सभागृहापुढे हा विषय मांडला होता. महापालिकेची जानेवारी, फेब्रुवारी आणि मार्च महिन्यातील तहकूब सभा महापौर सुशीला आबुटे यांच्या अध्यक्षतेखाली सोमवारी झाली.

विरोधीपक्षाचे सुरेश पाटील यांनी सावस्कर यांच्यावर ५७ आरोप असल्याचे सांगत त्यांची माहिती मांडली.प्रा. अशोक निंबर्गी यांनी बेकायदा काम करणाऱ्या अधिकाऱ्यांना अभय देऊ नये, असे नमूद करत सत्ताधाऱ्यांची भूमिका संशयास्पद असल्याचे सांगितले.
नगरसेवक आनंद चंदनशिवे यांनी चौकशीला स्थगिती दिली तर जनता तुम्हाला माफ करणार नाही, असे सांगितले. यावेळी नगरसेवक जगदीश पाटील, नगरसेविका रोहिणी तडवळकर यांनी भूमिका स्पष्ट करत चौकशीची मागणी केली. विरोधकांनी आगपाखड केल्यानंतर सभागृह नेते संजय हेमगड्डी यांनी सूचनेत बदल करत चौकशी करून विषय फेरसादर करण्याची दुरुस्ती केली. त्यास सभागृहाने मंजुरी दिली.

चौकशी करता येते
न्यायालयातप्रकरण असले तरी अधिकाऱ्यांची चौकशी करता येते. प्राधिकरण अधिकारी आयुक्त नाही तर सभागृह आहे. सभागृहाने मान्यता दिल्यास पुढील चौकशी करता येते.
- विजय कुमारकाळम-पाटील, आयुक्त, महापालिका अन्य मंजूर विषय

शिवाजी महाराजांची लहान मूर्ती तयार करणे. एलईडीसाठी सरकारकडे पाठपुरावा, आयुक्तांना अधिकार. कर फेर पाहणी समिती नेमली, अहवालासाठी महिन्याची मुदत. महिबूब सुभानी दर्गा परिसरात सुधारणा करणे. जिल्हा वार्षिक योजनेतून ४५ विकास कामांना मान्यता. पांढरे वस्तीत महिला शौचालय बांधणे. अक्कलकोट रोडवर बेरोजगार युवकांसाठी गाळा बांधणे. नगरसेविका कुमूद अंकाराम यांचे सदस्यत्व रद्द करणे नामंजूर झाला.
बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकास मंजुरी
सोलापूरविविध४१ विषयांना महापालिका सभागृहात मंजुरी देण्यात आली. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे स्मारक सोलापुरात व्हावे, असा ठराव सभेत एकमताने घेण्यात आला. जागेची अडचण होती. अशोक चौकात २७०० चौरस मीटर जागा सुचवली आहे.
पाण्यात क्लोरिन मोजून टाकणे आवश्यक आहे. त्यासाठी उपाययोजना करण्यात येईल, असे आयुक्त विजयकुमार काळम-पाटील यांनी सभागृहात सांगितले. स्थानिक संस्था कर (एलबीटी) २५ कोटी रुपये महिनाअखेर जमा होतील. व्यापाऱ्यांशी बोलणे झाले असल्याचीही माहिती त्यांनी दिली.
माजी नगरअभियंता सावस्कर यांच्या चौकशीचा प्रस्ताव फेरसादर होणार, सभेत विरोधकांनी धरले धारेवर