आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Legislator Ramesh Kadam Sentence To Judicial Custody

आमदार सुरेश कदम यांची न्‍यायालयीन कोठडीत रवानगी; दगडफेक प्रकरण

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर – राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रमेश कदम यांच्या नेतृत्वाखालील अटक मोर्चातील जमावाने शनिवारी पोलिस ठाण्यात घुसण्याचा प्रयत्न केल्‍याने तणाव निर्माण झाला होता. दरम्‍यान, आमदार कदम समर्थकांनी पोलिसांच्या दिशेने तुफान दगडफेक केली. यात १२ पोलिस कर्मचारी जखमी झाले होते. पोलिसांनी आमदार कदम यांच्‍यासह काही कार्यकर्त्‍यांना अटक केली नाही. त्‍यांना आज (रविवार) न्‍यायालयात हजर केली असता कदम यांच्‍यासह 57 आंदोलकांची न्‍यायालयीन कोठडीत रवानगी करण्‍यात आली.

प्रशासनाचा नकार डावलून मोहोळमध्ये शिवाजी चौकाजवळील पुणे-सोलापूर हायवे उड्डाणपुलाखाली मारलेल्या जाळ्या काढण्यात आमदार कदम यांनी पुढाकार घेतला. याप्रकरणी मोहोळ पोलिसात आमदार कदम यांच्यासह तिघांवर गुन्हा दाखल झाला होता. दरम्यान, प्रशासन खोटे गुन्हे दाखल करत असल्याचे सांंगत स्वत:ला अटक करवून घेण्यासाठी कदम यांनी शनिवारी आपल्या कार्यालयापासून पोलिस ठाण्यावर मोर्चा काढला. कदम यांच्यासमवेत असलेले कार्यकर्ते गोंधळ घालत पोलिस ठाण्याच्या गेटमधून आत जाण्याच्या प्रयत्नात होते. जमावाला पांगविण्यासाठी पोलिसांनी लाठीमार सुरू करताच जमावाने पोलिसांच्या दिशेने दगडफेक केली. पोलिसांच्या चार वाहनांचे नुकसान झाले. काही पोलिस कर्मचारी कार्यकर्तेही जखमी झाले. आता कदम यांची 14 दिवस न्‍यायालयीन कोठडीत रवानगी करण्‍यात आली आहे.