आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

घरबसल्या ठरवा वाहन परवान्याच्या परीक्षेची वेळ

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - केंद्रीय परविहनमंत्री नितीन गडकरी यांनी आरटीओ कार्यालयातील कामकाजात गती आणण्यासाठी ई गव्हनर्सचा वापर करण्याचे ठरवले आहे. त्या दृष्टिकोनातून सोलापूर आरटीओ कार्यालयाने मात्र आतापासून प्रयत्न सुरू केले आहे. वाहन परवान्यासाठी आपल्याला जी वेळ सोयीची ठरणार आहे ती वेळ नविडून त्या वेळेतच परीक्षा देऊ शकणार आहे.
सोलापूर आरटीओ कार्यालय सध्या एक नवीन वेबसाइट बनवण्याचे काम करत आहे. या वेबसाइटवर आपण वाहन परवान्याची तारीख व वेळ नविडू शकणार आहे. त्यासाठी वेबसाइटवर नावं, वाहनधारकांची पूर्ण माहिती द्यावी लागणार आहे. त्यानंतर कॅलेंडर ऑप्शन नविडून आपण आपल्याला हवी असणारी तारीख व वेळ नविडावी. ही सर्व माहिती भरल्यानंतर आपण नविडलेल्या तारखेच्या दिवशी व त्यावेळी आरटीओ कार्यालयात आवश्यक त्या कागदपत्रासोबत उपस्थित राहून वाहन परवान्याची परीक्षा देऊ शकणार आहे. यासाठी तुम्हाला रांगा लावाव्या लागणार नाही. परीक्षेत उत्तीर्ण झाल्यानंतर एका तासात परवाना मिळू शकणार आहे. १ सप्टेंबरपासून ही वेबसाइट सुरू होणार अाहे.
याचा फायदा काय
येथे केवळ अपॉइंटमेन्ट असणा ऱ्यांनाच प्रवेश असेल, मर्यादित वाहनधारकांमुळे चांगली सेवा मिळेल. वाहनधारकांना आपल्या सोयीची वेळ नविडता येईल.
वाहनांच्या फिटनेस सर्टिफिकेटला आता ब्रेक
वाहनांना योग्यता प्रमाणपत्र देताना वाहनाच्या व्रेकची तपासणी होणे महत्त्वाचे असते. वाहनांच्या अपघातात होण्यामागची जी कारणे आहेत त्यातील एक महत्वाचे आरटीओ कार्यालयाने खास पध्द्तीचा ब्रेकची चाचणी करणारा ट्रॅक सोलापूर उप प्रादेशिक कार्यालयात तयार केला आहे. सोलापूर उप प्रादेशिक परविहन कार्यालयात धावपट्टी चाचणीच्या शेजारी एक १४० मीटर लांबीचा ट्रॅक तयार केला आहे. ट्रॅक , टेम्पो, कंटेनर, आदी जड वाहनांचा समावेश असेल. ही चाचणी देणे अनविार्य आहे. या ट्रॅकवर गाडी आल्यानंतर त्यांना ताशी ५० किमीच्या वेगाने गाडी चालवून दाखवावी लागणार आहे. ब्रेक लावल्यानंतर गाडी १३ मीटरच्या आत थांबणे गरजेचे आहे. १३ मीटरच्या बाहेर गेल्यानंतर त्याला प्रमाणपत्र दिले जाणार नाही.
वाहन अपघातांना आळा
राज्यातील अशा प्रकारचा हा पहिला ट्रॅक तयार करण्याचा मान सोलापूरला मिळाला आहे. या ट्रॅकमुळे वाहनांच्या ब्रेक सििस्टम चांगली सुधारणा होणार आहे. यामुळे काही अंशी तरी वाहन अपघातांना आळा बसणार आहे, असे उप प्रादेशिक परविहन अधिकारी दीपक पाटील यांनी सांगितले.
परवान्यासाठी वेळ वाचणार
यामुळे वाहनधारकांची वेळ वाचणार आहे. या ठिकाणी केवळ परीक्षा देणाऱ्यांनाच प्रवेश असेल. त्यामुळे आपोआपच एजंट हद्दपार होतील.
दीपक पाटील, प्र. उप प्रादेशिक परविहन अधिकारी, सोलापूर