आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Life Achievement Award In Solapur News In Marathi

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

सत्ता मिळवणे सोपे, टिकवणे अवघड : झाडबुके; जीवनगौरव पुरस्कार प्रदान, समाजभूषणाने सन्मान

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - सत्ता मिळवणे खूप सोपे आहे, परंतु, ती टिकवणे अवघड आहे, असे प्रतिपादन बार्शीच्या माजी नगराध्यक्षा प्रभाताई झाडबुके यांनी रविवारी येथे केले. नगराध्यक्षपदाच्या 22 वर्षांच्या सेवेत माझी भूमिका श्यामच्या आईसारखी ठेवली. म्हणून 99 टक्के ठराव एकमताने मंजूर व्हायचे, अशी आठवणही त्यांनी सांगितली.

सिद्धेश्वर मंदिर परिसरात महाराष्ट्र वीरशैव सभेच्या वतीने समाजभूषण, जीवनगौरव पुरस्काराचे वितरण झाले. झाडबुके यांचा जीवनगौरव पुरस्काराने सन्मान करण्यात आला. त्यानंतर त्या बोलत होत्या.

डॉ. शिवमूर्ती शाहीर प्रमुख पाहुणे होते. अध्यक्षस्थानी धर्मराज काडादी होते. आमदार प्रणिती शिंदे, विजयकुमार देशमुख, सिद्रामप्पा पाटील, माजी आमदार विश्वनाथ चाकोते, रतिकांत पाटील, शिवशरण पाटील, स्वामी समर्थ सूत गिरणीचे अध्यक्ष राजशेखर शिवदारे, काँग्रेसचे सरचिटणीस बसवराज पाटील-नागराळकर पाहुणे होते. सभेचे प्रांतिक कार्याध्यक्ष प्रबुद्धचंद्र झपके, जिल्हाध्यक्ष सिद्रामप्पा उण्णद, शहराध्यक्ष नंदकुमार मुस्तारे, महिला जिल्हाध्यक्ष विजया थोबडे, शहराध्यक्ष पुष्पा गुंगे, परिवहन सभापती आनंद मुस्तारे, दक्षिण पंचायत समितीच्या सभापती इंदुमती अलगोंडा उपस्थित होत्या.

नंदकुमार मुस्तारे यांनी प्रास्ताविक केले. श्वेता हुल्ले व नरेंद्र गंभीरे यांनी सूत्रसंचालन केले. राज पाटील यांनी आभार मानले.