आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लिफ्टने जाताय? धोके जाणा, लहान मुलांना हाताळू देऊ नका, विशेष काळजी घ्या

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर- झपाट्याने वाढणा-या सिमेंटच्या जंगलात अनेक उंच इमारती उभारल्या जात आहेत. त्यात अत्याधुनिक सुविधा मिळवताना काही तांत्रिक चुकांमुळे जीव गमावण्याची वेळसुद्धा येते. रविवारी अशाच एका घटनेतून एका चिमुरडीचा मृत्यू झाला. लिफ्टमध्ये विजेचा शॉक लागून मृत्यू होण्याची ही पहिलीच घटना असावी. अशा घटना पुन्हा घडू नयेत म्हणून ‘दिव्य मराठी’ने काही तज्ज्ञांशी संवाद साधला.
लिफ्टचालकांनी हे पाहावे
स्प्रिंग बफर, ग्रील, दरवाजे, वायर रोप, कपलिंग, गिअर बॉक्स व व्हिल्स्ची तपासणी न झाल्याने धोका निर्माण होऊ शकतो. इलेक्ट्रिकल इन्स्पेक्टरच्या संख्येतही वाढ होणे गरजेचे आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाकडे नोंदणी करून सुरक्षा प्रमाणपत्र आणि परवाना मिळवणे तितकेच आवश्यक आहे. शिवाय आपत्ती घडण्याअगोदर दक्षता घेणे आवश्यक आहे.
अपघाताची ही कारणे
1. क्षमतेपेक्षा अधिक व्यक्ती लिफ्टमध्ये चढल्याने.
2. लिफ्टमधील इंटरकॉम साधने सुस्थितीत नसल्याने.
3. बटणांशी खेळल्याने शॉर्टसर्किट होऊ शकते.
4. दुय्यम प्रतीची बटणे व साहित्य वापरल्याने धोका
5. लिफ्टमन नसल्यानेही अपघात.
लिफ्टमध्ये जाताय, घ्या दक्षता
1. तांत्रिक बाबी समजून मगच प्रवेश करा.
2. सुरक्षा प्रमाणपत्र आहे का तपासा.
3. मुलांना एकट्याने वापर करू देऊ नका.
4. अग्निशामक यंत्रणा आहे का पाहा.
5. उघड्या पॅनलला हात लावू नका.
शहरातील लिफ्टचे प्रकार
ग्लास, ऑटोमॅटिक, सेंट्रल ओपनिंग, कोलॅॅप्सेबल डोअर, स्विंग डोअर, कॅप्सूल, टेलिस्कोपिक ओपन डोअर.

मुंबई लिफ्टस् रुल्स् 1958 च्या कलम 3.4.2 नुसार आणि लिफ्ट अ‍ॅक्ट 1959 मध्ये नमूद केल्याप्रमाणे प्रत्येक लिफ्टची वर्षातून दोनदा तपासणी होणे अनिवार्य आहे.’’
अ‍ॅड. रियाज शेख, कायदेतज्ज्ञ

ऑपरेटिंग पॅनलमध्ये टोगल स्विचमुळे करंट उतरू शकतो. त्यामुळे प्लेटला विद्युतप्रवाह उतरू शकतो. पावडर कोटेड, प्लाय, एफएस व ग्लास यातील स्विंग प्रकारातील लिफ्टला हा धोका असतो.’’
दत्तराज खरे, लिफ्ट तपासणीतज्ज्ञ

सज्ञानांसाठी आयुर्विमा महामंडळाने टर्म इन्शुरन्स पॉलिसी (मुदत विमा योजना) प्रकारातील रिस्क कव्हर जास्त आणि मासिक हप्ता कमी असा महिन्याला 650 रुपये भरून एक कोटींपर्यंतचा विमा आहे.’’
व्ही. के. गवई, एलआयसी अधिकारी

मुख्य नोंदणी मुंबई येथे असलेल्या ‘लिफ्ट इन्स्पेक्शन ऑफिस’ नावाने सार्वजनिक बांधकाम विभागात कार्यालय असते. लिफ्ट नोंदणीची संबंधित जिल्ह्यानुसार विभागणी होते. लिफ्टची उभारणी झाल्यावर तपासणी करून मंजुरी मिळते. यासाठी 600 रुपये वार्षिक शुल्क आहे.’’ बी. जी. चव्हाण, पीडब्ल्यूडी लिफ्ट निरीक्षण विभागप्रमुख