आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Limca Certificate To Get Mount Everest Anand Bansode At Solapur

एव्हरेस्टवीर आनंदला ‘लिम्का’चे प्रमाणपत्र

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर- माऊंट एव्हरेस्ट सर करणार्‍या आनंद बनसोडे याला लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड्सचे प्रमाणपत्र नवी दिल्ली येथे देण्यात आले. सुमारे सहा हजार मीटर उंचीवर त्याने राष्ट्रगीत गिटारवर सादर केले होते. सर्वांत जास्त उंचीवर संगीत सादरीकरणाचा हा जागतिक विक्रम होता. त्याची दखल घेत ‘लिम्का’ने आनंदला गौरवले आहे.

पिंपरी चिंचवड (पुणे)मधील सागरमाथा गिर्यारोहण संस्थेने आयोजित केलेल्या मिशन एव्हरेस्ट - 12 मध्ये आनंद सहभागी झाला होता. त्याने 6 मे रोजी एव्हरेस्ट कॅम्प 2 म्हणजेच 6300 मीटर म्हणजेच 20 हजार 669 फूट उंचीवर राष्ट्रगीत सादर केले होते. त्याची नोंद ऑगस्ट 2012 मध्येच झाली होती. वादनासाठी आनंदने अमेरिकेहून एक खास अँम्प्लीफायर आणले होते.

गृहमंत्री शिंदे यांच्याकडून कौतुक
नवी दिल्लीत प्रमाणपत्र स्वीकारल्यानंतर आनंदने केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांची निवासस्थानी भेट घेतली. ते म्हणाले की, मी लहान होतो. 1953 मध्ये शेरपा तेनसिंग व एडमंड यांनी सर्वांत प्रथम जगातील सर्वांत उंच शिखर सर केले होते.त्याचे कुतूहल वाटले. पण, आता माझ्या घरचा माणूसच एव्हरेस्टवीर झालेला आहे. अभिमान वाटतो आहे.

गुरूंमुळे रेकॉर्ड करणे शक्य झाले
4गिर्यारोहणातील माझे गुरू सुरेंद्र शेळके व अमेरिकेतील मित्र स्टीव्ह समाना, जो मिकी, लिना बर्रिओ यांनी मार्गदर्शन केल्यामुळेच हे रेकॉर्ड करू शकलो.’’
-आनंद बनसोडे, एव्हरेस्टवीर