आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Lingayat Catagary Said Reservation Is The Our Rights Issue

लिंगायत समाजासाठी आरक्षण हा हक्कच

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - राज्यात 84 लाख लिंगायत समाज आहे, त्यांना आरक्षणाद्वारे सामाजिक न्याय मिळाला पाहिजे, अन्यथा हा समाज लोकसभेप्रमाणे येत्या विधानसभेतही सत्ताधार्‍यांना चांगलाच धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा शिवा संघटनेचे संस्थापक अध्यक्ष प्रा. मनोहर धोंडे यांनी आज येथे दिला.
सोमवारी दुपारी एक वाजता चार पुतळा ते जिल्हाधिकारी कार्यालयावर विविध मागण्यांसाठी मोर्चा काढण्यात आला. येथे मोर्चाचे रूपांतर सभेत झाले. या वेळी प्रा. धोंडे मार्गदश्रेन करीत होते. या वेळी आमदार विजयकुमार देशमुख, माजी आमदार शिवशरण पाटील, सरचिटणीस अँड. प्रशांत शेटे, प्रदेश सरचिटणीस उमाकांत शेटे, जिल्हाध्यक्ष अरविंद पाटील, जिल्हा संघटक राजेंद्र कुलकर्णी, शहराध्यक्ष शिवानंद हिप्परगे, जिल्हा उपाध्यक्ष श्याम देशेट्टी, अक्कलकोट तालुकाध्यक्ष बसवराज बिराजदार, शिवानंद पाटील, नगरसेविका शोभा बनशेट्टी उपस्थित होते. आमदार देशमुख म्हणाले, ‘विधानसभा निवडणुकीनंतर सत्ताबदल निश्चित आहे. त्यावेळेस लिंगायत समाजाच्या प्रमुख मागण्या
  • वीरशैव लिंगायत समाज, सर्व पोटीजातींना ओबीसी आरक्षण मिळावे
  • मंगळवेढा येथे महात्मा बसवेश्वरांचे राष्ट्रीय स्मारक व्हावे
  • सोलापूर विद्यापीठाला महात्मा बसवेश्वर विद्यापीठ किंवा सिद्धेश्वर विद्यापीठ नाव देण्यात यावे
  • बसवेश्वर स्मारकासाठी सव्र्हे, लवकरच अंतिम स्वरूप
लिंगायत समाजातर्फे निवेदन स्वीकारत जिल्हाधिकारी डॉ. प्रवीण गेडाम यांनी स्मारकाचे काम लवकर पूर्ण करण्याचे आश्वासन दिले. ‘मंगळवेढा येथे महात्मा बसवेश्वर स्मारकासाठी जागा संपादित करण्यासाठी सव्र्हे झाला आहे. त्याचे काम प्रगतिपथावर असून येत्या दोन महिन्यांत म्हणजे विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता सुरू होण्यापूर्वी याबाबत स्मारक समितीसमवेत चर्चा करून अंतिम स्वरूप देण्यात येईल’ असे ते म्हणाले.