आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘लिंगायत’ला अल्पसंख्याक दर्जासाठी प्रयत्न - केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर - जैन समाजाला ज्या प्रमाणे महाराष्ट्रात अल्पसंख्याक समाजाचा दर्जा मिळवून दिला, त्याप्रमाणे वीरशैव लिंगायत समाजाला अल्पसंख्याक समाजाचा दर्जा मिळवून देण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार आहे. वीरशैव समाजाची ही मागणी जुनी आहे, ती पूर्ण करण्यासाठी माझे आवश्यक ते सहकार्य लाभेल, असे प्रतिपादन केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी केले.

नॉर्थकोट प्रशालेच्या प्रांगणात ऑल इंडिया वीरशैव महासभा महाराष्ट्र विभागाच्या वतीने रविवारी (दि. 7) दुपारी वीरशैव लिंगायत महासंमेलन आयोजित करण्यात आले होते. या वेळी कर्नाटक व महाराष्ट्र राज्यातील आमदार व खासदार तसेच मान्यवरांची उपस्थिती होती. महासंमेलनातील अध्यक्षीय भाषणात शिंदे म्हणाले, गेल्या 10 ते 15 वर्षांपासून वीरशैव समाजाला अल्पसंख्याक दर्जा मिळावा म्हणून प्रयत्न चालू आहेत. मी देखील त्यासाठी प्रय}शील आहे. गरज पडल्यास महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांशी या विषयी चर्चा करेन. मात्र समाजाचे काम करणार्‍यांनी याचा पाठपुरावा केला पाहिजे. आपण मंत्र्यांना निवेदन दिले म्हणजे आपले काम झाले, असे नाही. त्याचा सातत्याने पाठपुरावा केला पाहिजे, असा चिमटा त्यांनी या वेळी काढला. महात्मा बसवेश्वरांच्या विचारांना उजाळा देताना शिंदे म्हणाले, बसवेश्वरांच्या विचारात मानवतेला एकसंध बांधण्याची शक्ती आहे. बसवेश्वरांनी आयुष्यभर सर्वधर्मसमभाव या विचारांची पूजा केली. आज अशाच विचारांची गरज आहे, असे ही शिंदे म्हणाले. गहिनीनाथ औसेकर महाराज व ऑल इंडिया वीरशैव महासभेचे अध्यक्ष भीमण्णाजी खंद्रे यांनी विचार मांडले. कार्यक्रमाची सुरुवात वेदघोषानी झाली. माजी आमदार तथा ऑल इंडिया वीरशैव महासभेचे महाराष्ट्राचे अध्यक्ष विश्वनाथ चाकोते यांनी प्रास्ताविक केले. श्वेता हुल्ले यांनी सूत्रसंचालन केले.

मान्यवरांची हजेरी
ऑल इंडिया वीरशैव महासभेच्या महाराष्ट्र राज्य विभागाच्या वतीने वीरशैव लिंगायत महासंमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी दीप प्रज्वलनाने कार्यक्रमाचे उद्घाटन करताना केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे . व्यासपीठावर माजी आमदार विश्वनाथ चाकोते, आमदार सिद्रामप्पा पाटील, गहिनीनाथ औसेकर महाराज, माजी गृहराज्यमंत्री सिद्धाराम म्हैत्रे, कर्नाटकातील विविध आमदार आदी.

आयोजकांचा ढिसाळपणा!
साडेअकराचा कार्यक्रम दोन वाजता सुरू झाला. त्यानंतर अध्र्या तास सत्काराचा कार्यक्रम चालला. लोकांच्या डोक्यावर छत नसल्याने त्यांना कार्यक्रम संपेपर्यंत उन्हातच बसून राहावे लागले. त्यांच्या अंगाची लाहीलाही होत होती. महिलांनी उन्हाचा त्रास असह्य झाल्यानंतर अनेकींनी परिसरातील झाडांच्या सावलीचा आसरा घेतला