आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अधिवेशनासाठी गेलेल्या गुरूजींच्‍या गांड्यामध्‍ये सापडल्या दारूच्या बाटल्या

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सांगली - संघटनेच्या अधिवेशनाच्या नावाखाली गोव्याच्या सहलीवर गेलेल्या बीड व सोलापूर जिल्ह्यातील गुरुजींनी परतीच्या प्रवासात सोबत आणलेला 60 हजार रुपयांच्या दारूचा साठा राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने जप्त केला. या प्रकरणी दोन चालकांना अटक करण्यात आली आहे.

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ओरोस येथे शिक्षक संघाचे राज्यस्तरीय अधिवेशन नुकतेच पार पडले. या अधिवेशनासाठी राज्यभरातून तीन लाख शिक्षक गेले होते. सिंधुदुर्गपासून गोवा जवळच असल्याने अनेकांनी
अधिवेशनाच्या नावाखाली गोव्याची सहलही केली. त्या ठिकाणी मनसोक्त मद्यपान करूनही शिक्षकांचे पोट भरले नाही. गोव्यात दारू स्वस्त मिळत असल्याने काही गुरुजींनी बॅगा भरभरून दारूच्या बाटल्या खासगी वाहनांतून गावाकडे आणण्याचा प्रयत्न केला. मात्र, हा अतिमोह अखेर त्यांच्याच अंगलट आला.

राज्य उत्पादन शुल्क विभागाने या महिन्यापासूनच गोव्याकडून येणा- सर्व मार्गांवर तपासणी पथके तैनात केली आहेत. रविवारी रात्री कोल्हापूर रस्त्यावर गस्त घालणा- पथकाने अधिवेशनावरून परतणा- बीड आणि सोलापूर जिल्ह्यातील गुरुजींच्या दोन गाड्या अडवल्या व दारू जप्त करण्यात आली.

काही शिक्षकांची चलाखी
पथकाने संजय भगवान गवळी (रा. गोपाळपूर, पंढरपूर) आणि हरिदास तुकाराम जाधव (रा. नांदूरघाट, बीड) या दोन चालकांना अटक केली असून दोन गाड्याही जप्त
केल्या आहेत. या गाड्यांमागे आणखी काही गाड्या होत्या; मात्र तपासणी होत असल्याचे पाहून या शिक्षकांनी शेजारच्या शेतात बाटल्या फेकून दिल्याचे दिसून आले.