आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Little Happiness, Little Sorrow In Municipal Corporation

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

मनपामध्ये कही खुशी, कही गम

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - सोलापूरमहापालिकेचे आयुक्त चंद्रकांत गुडेवार यांची शुक्रवारी बदली झाली. दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास त्यांना बदलीचे पत्र मिळाले आणि त्यांनी सायंकाळी साडेपाच वाजता आपला पदभार अप्पर आयुक्त विलास ढगे यांच्याकडे सोपविला. राज्य सरकारने आज ४२ आयएएस अधिका-यांच्या बदल्या केल्या. त्यात सोलापूरचे आयुक्त म्हणून एस. एन. गायकवाड यांच्या नावाचा उल्लेख आहे. परंतु गुडेवार यांच्या नावाचा उल्लेख नाही.
दरम्यान, त्यांना पूर्वीच्याच म्हणजे ग्रामीण विकास खात्यात पुन्हा बोलावून घेण्यात आले आहे. तसे पत्र महापालिकेला मिळाले. त्यांच्या जागी येणारे शेखर गायकवाड हे अभ्यासू अधिकारी म्हणून ओळखले जातात. साहित्यिक अंग असलेले गायकवाड हे महापालिकेला शिस्त आणून शहर विकासाचे प्रश्न कसे हाताळतात याकडे आता लक्ष लागून राहिले आहे. गुडेवार यांच्या काळात झालेल्या अतिक्रमण हटाव, १५० कोटींचा ड्रेनेजचा मक्ता रद्द, एलबीटी वसुली, गाळे लिलाव अशा अनेक निर्णयाबाबत कोणती भूमिका घेतात, व्यापारी, मनपा पदाधिकारी यांच्यात कसा समन्वय साधतात याकडे लक्ष लागले आहे.

बसपाचीआज निदर्शने
श्री.गुडेवार यांच्या बदलीच्या निषेधार्थ बसपाच्या वतीने उद्या फेब्रुवारी रोजी दुपारी वाजता महापालिका प्रवेशद्वारासमोर निषेध निदर्शने करण्यात येणार असल्याची माहिती बसपाचे नगरसेवक आनंद चंदनशिवे यांनी दिली. दरम्यान महापालिका कर्मचारी तसेच काही संघटनांनी उद्या गुडेवार यांच्या बदलीच्या विरोधात आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. नवे आयुक्त एस. एन. गायकवाड सोलापूर महापालिकेच्या आयुक्तपदी ठाणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी एस. एन. गायकवाड येणार असल्याची माहिती मनपाच्या अधिकृत सुत्राकडून सांगण्यात आली. रुजू होण्याची तारीख अद्याप निश्चित नाही.

चंद्रकांत गुडेवारांनी गाजवला कार्यकाळ
चंद्रकांतगुडेवार हे जुलै २०१३ रोजी आयुक्तपदी रुजू झाले. यानंतर राजकारण मध्ये आले आणि २३ जून २०१४ रोजी त्यांची बदली झाली. सोलापूरकरांनी उठाव केला आणि काहीनी बदलीच्या विरोधात न्यायालयात धाव घेतली. दीड महिन्याच्या कालावधीनंतर १४ ऑगस्ट २०१४ रोजी ते पुन्हा आयुक्तपदावर रुजू झाले.त्यांनतर एलबीटीची लक्षणीय वसुली, अतिक्रमण मुक्तीसाठी प्रयत्न केले, बेकायदेशीर बांधकामावर मोहीम, व्हॉल्व्हो बस, रस्ते , ड्रेनेजचे काम, अनेक भ्रष्टाचारींवर कारवाई करीत ते सोलापूरकरांच्या गळ्यातील ताईत बनले.

किती वेळा भांडायचे, कंटाळा आलाय
बदलीबाबतफारशी प्रतिक्रिया देता चंद्गकांत गुडेवार यांनी बदली झाल्याचा दुजोरा देऊन आपण आता बदली रद्दसाठी प्रयत्न करणार नसल्याचे सांगितले. कितीवेळा भांडायचे, आता कंटाळा आला असे त्यांनी बोलून दाखविले. बदलीबाबत पालकमंत्री विजय देशमुख यांनी प्रतिष्ठेचा प्रश्न केला होता, असे त्यांच्या बोलण्यातून जाणवत होते.