आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

एलबीटीची कारवाई सुरू; पैसे भरण्यासाठी दिली चार दिवसांची मुदत

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर: स्थानिक संस्था कर (एलबीटी) न भरणार्‍या तनुजा केतन शहा, अनिल डोईजोडे यांच्यासह 20 व्यापार्‍यांना महापालिकेने शुक्रवारी नोटीस जारी केली आहे. चार दिवसांनंतर खाते गोठवण्यासंबंधीची नोटीस त्या व्यापार्‍यांना बजावण्यात येणार आहे.
दरम्यान, एलबीटीचे विवरण पत्र भरले नाही म्हणून अचल अँटोमोबाइलला पाच हजार रुपये दंड आकारण्यात आला आहे. महापालिकेने व्यापार्‍यांवर कारवाई सुरू केल्याने एलबीटी भरणार्‍यांची संख्या वाढली आहे.
शहरास एलबीटी लागू असल्याने व्यापार्‍यांनी हळूहळू का होईना एलबीटी भरण्यास सुरुवात केली आहे. एलबीटी न भरणार्‍या 119 व्यापार्‍यांवर पालिकेने फौजदारी दाखल केली होती. नंतर ती काढून घेण्यात आली. त्यापैकी 20 व्यापार्‍यांनी एलबीटी भरला नाही, त्यामुळे त्यांच्या विरोधात पुन्हा कारवाईचा बडगा उगारण्यात आला आहे. त्यांचे खाते गोठवण्यासाठी मनपाने प्रशासकीय कारवाई सुरू केली. पैसे भरण्यासाठी चार दिवसांची मुदत त्यांना देण्यात आली आहे.
कारवाई तूर्त तहकूब
एलबीटी न भरणार्‍या व्यापार्‍यांच्या विरोधात कारवाई करण्यात येणार आहे. त्यामुळे व्यापारी एलबीटी भरत आहेत. त्यांच्याकडून प्रतिसाद मिळत असल्याने माल अडवणे आदी प्रकारची कारवाई तूर्त तहकूब केली आहे.’’ अजित जाधव, उपायुक्त