आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

साडेतीन लाख रुपयांचा गांजा केला जप्त

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर- तुळजापूर रस्त्यावरील तळेहिप्परगा गावच्या शिवारात पोलिसांनी सापळा रचून दोघांना अटक केली. त्यांच्याकडील साडेतीन लाख रुपये किमतीचा गांजा जप्त करण्यात आला.
गणपती घाटाजवळील एका पेट्रोल पंपाच्या परिसरात गांजाची बेकायदा विक्री करण्याच्या उद्देशाने आलेल्या सिराज मुबारक शेख (वय ३१, रा. वेताळ नगर, तुळजापूर) आणि रविकांत भीमराव चव्हाण (वय ३०, रा. सेंटलमेंट) या दोघांना मुद्देमालासह अटक करण्यात आली. लाख ६० हजार रुपयांच्या मुद्देमालात तीन लाख ६० हजार रुपये किमतीचा गांजा अन् टाटा इंडिका व्हिस्टा या गाडीचा समावेश आहे. ही कारवाई १४ जानेवारी रोजी सायंकाळी ग्रामीणच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी केली. दोन्ही आरोपींना न्यायालयाने १९ जानेवारीपर्यंत पोलिस कोठडी सुनावली.
गुन्हे शाखेचे पोलिस उपनिरीक्षक संदीप चव्हाण यांना गांजाबाबत माहिती मिळताच त्यांनी पोलिस अधीक्षकांसह, अप्पर पोलिस अधीक्षक आणि गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक नितीन कौसडीकर यांना कळवली. त्यानंतर सहाय्यक पोलिस निरीक्षक संजीवकुमार झाडे, पोलिस उपनिरीक्षक संदीप चव्हाण, सिद्राम धायगुडे, सुनील साळुंखे, प्रेमेंद्र खंडागळे, विजय कोरे, इस्माईल शेख, राहुल सुरवसे यांचे पथक रवाना झाले.
असा रचला सापळा
सायंकाळीसाडेसात वाजण्याच्या सुमारास शासकीय वाहन गणपती घाटाजवळ थांबवले. मिळालेल्या माहितीनुसार पथक पायी निघाले. एस्सार पेट्रोल पंपाजवळ टाटा इंडिका व्हिस्टा (एम एच १३, बी एन ०६९५ या वाहनासह दोघे जण उभे असल्याचे दिसले. दोघांच्या हालचाली संशयास्पद वाटल्याने त्या गाडीची झडती घेतली. गाडीत तीन मोठ्या पोत्यात ७२ किलो ७०० ग्रॅम वजनाचा गांजा मिळून आला.