आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Local Shicsena Party Issue At Solaur, Divya Marathi

शिवसैनिक म्हणतात, सत्तेत येणे महत्त्वाचे, अपकमिंग नेत्यांमुळे होतेय कोंडी, पण पक्षनिष्ठा कायम

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - पक्षबदलला तरी सत्ताधारी तोच राहतो. अशीच परिस्थिती सोलापूर शहर जिल्ह्यातील शिवसैनिकांची झाली आहे. गेल्या अनेक वर्षांपासून ते शिवसेनेचा भगवा ध्वज खांद्यावर घेऊन पक्षवाढीसाठी जीवाचे राण केले आणि आता आयात केलेल्या नेते मंडळींमुळे त्यांची निष्ठाच पणाला लागली आहे. पक्ष सत्तेत येणे महत्त्वाचे आहे, असे शिवसैनिकांनाही वाटू लागले आहे.
सध्या जिल्ह्यात शिवसेनेत येणाऱ्यांची गर्दी खूपच वाढली आहे. त्यामुळे मूळ शिवसैनिक या गर्दीत हरवून चालल्याची प्रतिक्रिया एकीकडे उमटत असताना शहरातील शिवसैनिकांना मात्र ‘सत्ता’ महत्त्वाची वाटू लागली आहे. पक्षात येणाऱ्या नेत्यांना घेण्याचा निर्णय पक्ष पातळीवरचा आहे. शिवसैनिकांची मते विचारात घेऊनच प्रवेश दिला जातो, येणाऱ्या नेत्यांमुळे आमची अडचण होतेय, हे खरे आहे. पण महाराष्ट्रात शिवसेनेची सत्ता येणेही महत्त्वाचे आहे. अशा भावना खुद्द शहरातील शिवसैनिकांमधूनही उमटू लागल्या आहेत. आमची शिवसेनेबरोबरची निष्ठा कायम राहील, असेही ते ठासून सांगताहेत. असे चित्र शिवसैनिकांचा कानोसा घेतला असता समोर आले.
व्यक्तीपेक्षा पक्ष महत्त्वाचा
विजय पुकाळे :
गेल्याअनेक वर्षांपासून भगवा ध्वज खांद्यावर घेऊन पक्षासाठी काम करत आहे. दुसऱ्या पक्षातून आलेल्या नेत्यांमुळे निष्ठावंत शिवसैनिकांची कोंडी होते, हे खरे आहे. पण, सर्व गोष्टींचा विचार करूनच पक्ष निर्णय घेत असतो. शेवटी बाळासाहेबांचे स्वन पूर्ण होणे हे महत्त्वाचे आहे. शिवरायांचा भगवा ध्वज फडकवण्यासाठी निष्ठावंतांनी त्यागाची भूमिका ठेवायला हवी. व्यक्तीपेक्षा पक्ष केव्हाही मोठा आहे.
अभ्यासकरून उमेदवारी
सदानंद येलुरे :
बाहेरच्याउमेदवारामुळे शिवसैनिकांची कोंडी होते, हे खरे आहे. मात्र जागा वाटपावेळी कुठला उमेदवार ताकदवान आहे यावरून उमेदवारी देण्यात येते. ज्या ठिकाणी ताकदवान उमेदवार नाही अशा ठिकाणी बाहेरून आलेल्या उमेदवारास जागा दिली जाते. ज्या टिकाणी पूर्वीपासून शिवसेनेचा बालेकिल्ला राहिला आहे. अशा मतदारसंघात निष्ठावंत शिवसैनिकांनाच तिकीट दिले जाते. उमेदवारीचा निर्णय वरिष्ठ पातळीवरून घेतले जातात. त्यामुळे यावर अधिक बोलणे उचित नाही.
सत्तेतयेण्यासाठी निर्णय घ्यावे लागतात
सुनील शेळके : शिवसैनिकांच्यामनात अशी भावना निर्माण होणे स्वाभाविक आहे. मात्र कुठल्याही नव्या उमेदवारास संधी देताना तेथिल स्थानिक निष्ठावंत शिवसैनिकास विश्वासात घेतले जाते. त्यांना डावलून कुठलाही निर्णय सेनेत होत नाही. काही निष्ठावंत शिवसैनिक दुखावतात हे खरे आहे. मात्र पक्ष हितासाठी काही निर्णय घेणे गरजेचे असते. शेवटी शिवसेना वाढणे सत्तेत येणे गरजेचे आहे.