आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सोलापूर-यशवंतपूर एक्स्प्रेसला इंजिनची धडक प्रकरण, इंजिनचालक पोतदार निलंबित

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर- सोलापूर रेल्वे स्थानकावरील फलाट दोनवर थांबलेल्या सोलापूर -यशवंतपूर एक्स्प्रेसला पाठीमागून इंजिनने ठोकरल्याप्रकरणी रेल्वे प्रशासनाने इंजिनचालक श्याम पोतदार यांना निलंबित केले आहे. चौकशीसाठी रेल्वेचे तीन वरिष्ठ अधिकार्‍यांची समिती नेमली आहे. ते दहा दिवसांत अहवाल सादर करतील. मंगळवारी सायंकाळी ही घटना घडली होती.

या प्रकरणात आठ ते दहा प्रवासी जखमी झाले होते. फलाटावर पॉईन्टसमन उभा असताना व समोर गाडी असतानाही चालकाने आपल्या कामात हलगर्जीपणा केला. एम. एस. माकम सहाय्यक परिचालन व्यवस्थापक, सहाय्यक संरक्षक अधिकारी एम. ए.समद, सहाय्यक यांत्रिक अभियंता ए. के. र्शीवास्तव यांची समिती तपास करणार आहे.

दोषींवर कारवाई
कामात हलगर्जी केल्याप्रकरणी इंजिनचालकास निलंबित करण्यात आले आहे. अहवाल आल्यानंतर नेमके चित्र स्पष्ट होईल. अहवालात ज्यांच्यावर दोषी असल्याचा ठपका असेल त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात येईल.’’ सुशील गायकवाड, विभागीय जनसंपर्क अधिकारी, सोलापूर रेल्वे