आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करासांगोला - आगामी लोकसभा निवडणूक पक्षासाठी, देशासाठी आणि नेत्यासाठी महत्त्वाची आहे. त्यासाठी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांचे विचार तळागाळापर्यंत राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी पोहोचवावेत. गेल्या निवडणुकीपेक्षा या वेळी माढा मतदारसंघातून राष्ट्रवादीला जास्तीत जास्त मातधिक्य द्यावे. राष्ट्रवादीच्या पदाधिकार्यांनी मित्र पक्षाला बरोबर घेऊन उद्याची निवडणूक पार पाडावी, असे आवाहन गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी सांगोला येथे केले. शहराध्यक्ष तानाजी पाटील यांच्या निवासस्थानी सोमवारी पक्षाच्या सर्व आघाड्यांच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांची लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मते जाणून घेण्यासाठी आयोजिलेल्या बैठकीत पाटील यांनी मार्गदर्शन केले.
या वेळी आमदार दीपक साळुंखे, आमदार रमेश शेंडगे, जिल्हाध्यक्ष मनोहर डोंगरे यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
बैठकीला पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष पोपटराव पवार, महिला बालकल्याण समितीच्या सभापती जयमाला गायकवाड, जिल्हा परिषद सदस्य राणीताई दिघे, बाबूराव गायकवाड, तालुकाध्यक्ष चंद्रकांत शिंदे, माजी नगराध्यक्ष अनिल खडतरे, युवक जिल्हाध्यक्ष रामेश्वर मासाळ आदी पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.
यावेळीच्या पाठिंब्यासाठी आमदार देशमुखांना विनंती
पाटील म्हणाले, माढा मतदार संघातून निवडून गेल्यानंतर शरद पवार यांनी मतदारांशी सदैव संपर्क ठेवला. गेल्या अनेक वर्षांपासून रखडलेले सिंचन प्रकल्प मार्गी लावले. दुष्काळी शेतकर्यांचे प्रश्न मार्गी लावले. विकासाला चालना दिली. विकासाच्या मुद्दय़ावर शेतकरी कामगार पक्षाने राष्ट्रवादी काँग्रेसला गेल्या निवडणुकीत पाठिंबा दिला. आगामी निवडणुकीतही तसेच सहकार्य राहावे, यासाठी आजही गणपतराव देशमुख यांना भेटून विनंती केली आहे. माढा मतदारसंघातील राष्ट्रवादीच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी सर्वांना विश्वासात घेऊन निवडणुकीला सामोरे जावे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.