आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Lok Sabha Election, Latest News In Divya Marathi

मतांचा वाढीव टक्का कोणाच्या पारड्यात?

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर- जिल्हा प्रशासनाने प्रथमच यंदाच्या लोकसभा निवडणुकीमध्ये मतदानामध्ये 15 टक्के वाढीचे उद्दिष्ट ठेवले होते. उद्दिष्ट पूर्ण झाले नसले तरी सोलापूर मतदारसंघामध्ये उद्दिष्टाच्या जवळ जाण्यात यश मिळाले हे वाढीव मतदान कोणत्या उमेदवाराच्या पथ्यावर पडेल, हे मतमोजणीनंतरच स्पष्ट होईल.
सोलापूर मतदारसंघामध्ये 2009 पेक्षा यंदा 9.27 टक्के मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. 17 लाख 136 मतदारांपैकी 9 लाख 50 हजार 187 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. यामध्ये 5 लाख 26 हजार 639 पुरुष मतदारांनी तर 4 लाख 23 हजार 356 महिलांचा समावेश आहे. मोहोळ मतदारसंघामध्ये यंदा प्रथमच 1 लाख 75 हजार 306 म्हणजेच 62 टक्के मतदारांनी कौल दिला आहे. यामध्ये महिला मतदारांपैकी 52 टक्के महिलांनी मतदानास सामोरे गेल्या आहेत.
भाजपचा बालेकिल्ला असलेल्या उत्तर सोलापूर मतदारसंघामध्ये 1 लाख 35 हजार 879 मतदारांपैकी 1 लाख 48 हजार 543 मतदारांनी कौला दिला आहे. यामध्ये 80 हजार 235 पुरुषांनी तर 68 हजार 304 महिलांनी निवडणूक प्रक्रियेत सहभागी होत मतदान केले. विशेष म्हणजे पहिल्यांदाच 4 तृतीयपंथीयांनी मतदान केले आहे. आमदार प्रणिती शिंदे प्रतिनिधीत्व करीत असलेल्या शहर मध्य मतदारसंघामध्ये फक्त 52 टक्के मतदारांनी मतदान केले. 2009 च्या तुलनेत यंदा 11 टक्के वाढ झाली. त्यावेळी 41 टक्के मतदारांनी मतदान केले होते. मागील लोकसभा निवडणुकीत शिंदे यांना 1 हजार मताधिक्य मिळालेल्या अक्कलकोट मतदारसंघातही 55 टक्के मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. 3 लाख 17 हजार 310 मतदारांपैकी 1 लाख 74 हजार 484 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. कॉंग्रेसचा बालेकिल्ला असलेल्या सोलापूर दक्षिण मतदारसंघामध्ये 51.95 टक्के मतदारांनी हक्क बजावला. 2 लाख 81 हजार 415 पैकी 1 लाख 46 हजार 199 मतदारांनी सहभाग नोंदविला. पंढरपूर-मंगळवेढा मतदार संघात मागील निवडणुकीत फक्त 43 टक्के मतदान झाले होते, यामध्ये यंदा 14 टक्के वाढ होऊन 1 लाख 64 हजार 698 जणांनी मतदान केले.