आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शरद पवारांच्या साक्षीने उमेदवारी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर-केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे आणि माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते हे दोन्ही उमेदवार मंगळवारी (दि.25) दुपारी 12 नंतर जिल्हाधिकारी कार्यालयात अर्ज दाखल करणार आहेत. गृहमंत्री शिंदे सोलापूर मतदारसंघातून तर मोहिते हे माढा मतदारसंघातून अर्ज दाखल करतील. केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार उमेदवारी अर्ज दाखल करतेवेळी आवर्जुन उपस्थित राहणार आहेत.
मागील निवडणुकीतही पवार, शिंदे अर्ज दाखल करताना एकत्र आले होते. यंदा पवार उमेदवार नसले तरीही दोन्ही मतदारसंघातील कार्यकर्त्यांना, पदाधिकार्‍यांना कानमंत्र देण्यासाठी 24 व 25 मार्च रोजी जिल्ह्यात दौर्‍यावर आहेत. केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे सोमवारी सकाळी सोलापुरात पोहचतील. मंगळवारी सकाळी उमेदवारीचा अर्ज दाखल करतील. त्यानंतर सायंकाळी 4 नंतर शिंदे व पवार दोन्ही नेते इचलकरंजीकडे हेलिकॉप्टरने रवाना होतील.
बहुजन समाज पक्षाचे अँड. सदाफुले सोमवारी अर्ज भरणार
सोलापूर लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी सोमवारी (दि. 24) अर्ज दाखल करणार असल्याचे बहुजन समाज पक्षाचे उमेदवार अँड. संजीव सदाफुले यांनी गुरुवारी पत्र परिषदेत सांगितले. माढा लोकसभा मतदारसंघातील उमेदवाराची घोषणा लवकरच प्रदेशाध्यक्ष विलास गरुड करणार आहेत.
अँड. सदाफुले म्हणाले, ‘काँग्रेस आणि भारतीय जनता पक्षाच्या राजकारणाला लोक वैतागले आहेत. त्यामुळे तिसरा पर्याय देण्याचा बसपाचा प्रयत्न आहे. सोलापूर आणि माढा लोकसभा मतदारसंघांतील दोन्ही उमेदवार सोमवारी अर्ज दाखल करतील.डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यानातील पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून मिरवणूक निघेल. जिल्हाधिकारी कार्यालयात अर्ज भरण्यात येईल. पत्र परिषदेला नगरसेवक आनंद चंदनशिवे, बबलू गायकवाड आदी पदाधिकारी उपस्थित होते.
बहुजन मुक्ती पार्टीही निवडणुकीच्या आखाड्यात
बहुजन मुक्ती पार्टीनेही सोलापूर लोकसभा मतदारसंघाच्या आखाड्यात उतरण्याचा निर्णय घेतला आहे. पुंडलिक वाघमारे यांना उमेदवारी देण्यात आल्याचे पक्षाचे पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष राजाभाऊ कदम आणि शहराध्यक्ष समीउल्लाह शेख यांनी गुरुवारी पत्र परिषदेत सांगितले.
शेख म्हणाले की, बहुजन मुक्ती पार्टी देशभरात 450 जागा स्वबळावर लढवित आहे. स्वामी असीमानांद यांनी आरएसएसबद्दल केलेल्या वक्तव्याला केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी पुष्टी देणारे विधान केले. पण त्यावर पुढे कारवाईच्या अंगाने काही झाले नाही. हे धोरण हाणून पाडण्यासाठी बहुजन मुक्ती पार्टी निवडणूक रिंगणात उतरल्याचे शेख यांनी सांगितले. दरम्यान, माढा मतदारसंघातून सुभाष पाटील यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली