आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Lok Sabha Election News In Marathi, Congress, Solapur, Divya Marathi

शक्तिप्रदर्शनात सत्ताधार्‍यांनी घेतली जोरदार आघाडी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर - ढोल - ताशांचा गजर आणि हलग्यांच्या कडकडाटात शहराच्या मध्यवर्ती भागातून पदयात्रा काढून काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने मंगळवारी शक्तिप्रदर्शन केले. सकाळी पदयात्रेनंतर सोलापुरातील काँग्रेसचे उमेदवार सुशीलकुमार शिंदे व माढय़ातील राष्ट्रवादीचे उमेदवार विजयसिंह मोहिते यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. रॅलीत मोहिते यांच्यापेक्षा शिंदे यांच्या कार्यकर्त्यांचाच रुबाब जास्त असल्याचे चित्र होते. जिल्ह्यातून आलेले राष्ट्रवादीचे बहुतांश कार्यकर्ते रॅलीत सहभागी होण्याऐवजी थेट जाहीर सभेच्या ठिकाणी उपस्थित झाले.


ठळक नोंदी
0काँग्रेस सेवादलाचे प्रमुख चंद्रकांत दायमा हे रथात ढोल-ताशाच्या आवाजात नृत्य करत होते. त्या रथात माजीमंत्री आनंदराव देवकते, विनोद भोसले आदी होते.
0मोहितेंसाठी पंढरपूर, माढा, करमाळा, सांगोला, माळशिरस, कोरेगाव, माण, फलटण तालुक्यातून कार्यकर्ते आले होते. या तालुक्यांमधील राष्ट्रवादीचे स्थानिक विरोधक असलेले काँग्रेस, शेकापचे कार्यकर्तेही दिसून आले.
0गृहमंत्री शिंदे यांच्याबरोबर स्वत:ची छबी असलेले शेकडो टी शर्ट दायमांनी कार्यकर्त्यांना वाटले.
0असंख्य महिला हिरव्या, केशरी काठ असणार्‍या पांढर्‍या साड्या घालून सहभागी झाल्या. तसेच, काँग्रेसचे पंजा चिन्ह असलेले बॅच, केसांना लावण्याच्या पिनांवर पंजाचे चिन्ह होते.
0शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास अभिवादन करून रॅलीला सुरवात. चार हुतात्मे व राजमाता अहिल्यादेवी व डॉ. आंबेडकर पुतळ्यास पुष्पचक्र अर्पण करून रॅली मार्गस्थ झाली.
0चार पुतळ्यासमोर भटक्या विमुक्त जाती-जमाती सेलतर्फे सुई-बिबे विक्रेत्या महिलांनी दोन्ही उमेदवारांचे स्वागत केले. आंबेडकर चौकात अल्पसंख्याक व मागासवर्गीय संघटनांनेही स्वागत केले.
0रॅलीत पाण्याचे पाऊच वाटप करण्यात आले. डॉ. आंबेडकर चौकात काही कार्यकर्ते पाणीपाऊच एकमेकांच्या अंगावर टाकत होते. त्या पिशव्यांचा खच चौकात रस्त्यावर पडला होता.
0महिलांना एकसारख्या साड्या अन् टी शर्ट, टोप्या दिल्या कुणी? याची निवडणुकीतील खर्चावर नियंत्रण ठेवणारे पथक दखल घेईल का? असा प्रश्न उपस्थित झाला आहे.
0गृहमंत्री शिंदे यांच्या पदयात्रेत पत्नी उज्ज्वला शिंदे, मुलगी आमदार प्रणिती, मोठी मुलगी प्रीती र्शॉफ, जावई राज र्शॉफ व त्यांची मुलं सहभागी झाले.
0रॅलीमध्ये सहभागी झालेले राष्ट्रवादीचे कार्यकर्ते ‘एकच वादा विजयदादा’, ‘दादांना मत, विकासाला मत’ अशा घोषणा देत होते.