आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Lok Sabha Election News In Marathi, Divya Marathi, Solapur, Madha

प्रचार संपला, प्रशासन यंत्रणा झाली सज्ज

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर - सोलापूर आणि माढा लोकसभा मतदारसंघातील उमेदवारांचा प्रचार मंगळवारी सायंकाळी पाच वाजता संपला. प्रचाराच्या तोफा थंडावल्यानंतर जिल्हा प्रशासनाची यंत्रणा सतर्क झाली. जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. प्रवीण गेडाम यांनी सायंकाळी पत्रकार परिषद घेऊन प्रशासकीय कामकाजाची माहिती दिली. सोलापूर आणि माढय़ातील मतदान केंद्रे, अधिकारी यांची आकडेवारी सांगत, त्यांनी एकूण आढावा घेतला.


इथे राहणार विशेष बंदोवस्त
2009 च्या लोकसभा निवडणुकीत 75 ते 95 टक्के मतदान झालेल्या केंद्रांवर निवडणूक यंत्रणेची करडी नजर राहणार आहे. यामध्ये कोंबडवाडी (मोहोळ), अंबड व कुडरू (करमाळा), परितेवाडी (माढा), फळवणी (माळशिरस). येथील मतदान केंद्रांवर शस्त्रधारी पोलिस बंदोबस्त असणार आहे. या शिवाय राजकीयदृष्ट्या संवेदनशील असलेल्या 50 गावांतील मतदान केंद्रांवरही विशेष बंदोबस्त असणार आहे. दर 20 मिनिटांनी मोबाइल व्हॅनची गस्तही ठेवण्यात येणार आहे.
सोलापूर, माढा व उस्मानाबाद मतदारसंघातील मतदार नसलेले; पण नेत्यांच्या प्रेमापोटी ठाण मांडलेल्या कार्यकर्ते व नातेवाइकांनी परत जाण्याचे आदेश (कलम 144 नुसार) प्रशासनाने काढला असून त्याचा अंमल सुरू झाला. तसे कोणी आढळून आल्यास त्यांच्यावर पोलिसकडून कारवाई होऊ शकते. निवडणूक खर्च निरिक्षक हरिवंशराय चौधरी यांनी मंगळवारी झोपडपट्टी भागात पाहणी केली. मतदान केंद्रावर 20 हजार 202 कर्मचारी तैनात केले आहेत. राज्य व केंद्र राखीव बलाच्या 9 तुकड्यांचा समावेश आहे.


95 टक्के ओळखपत्रे वाटप
मतदानासाठी मतदार यादीत नाव आणि निव-डणूक ओळ-खपत्र असणे बंधन-कारक आहे. जिल्ह्यातील 95.50 टक्के मतदारांना ही ओळखपत्रे देण्यात आली आहेत. उर्वरित मतदार व्होटर स्लिपचा वापर करावा. निवडणूक आयोगाने निश्चित केलेल्या पैकी छायाचित्राचे ओळखपत्र दाखवणे आवश्यक आहे.’’ डॉ. प्रवीण गेडाम, निवडणूक निर्णय अधिकारी
3सोलापूरमध्ये 16 तर माढा मतदारसंघातून 24 उमेदवार निवडणुकीसाठी रिंगणात आहेत. दोन्ही मतदारसंघात पहिल्यांदाच दोन बॅलेट युनिटचा वापर. 3महसूल व पोलिस यंत्रणेचे 28 हजार कर्मचारी तैनात 3कर्मचारी ने-आणसाठी खासगी 1 हजार 106 बस आणि 136 जीप वाहनांचा ताफा


निर्भयी मतदान करा
सुमारे तीन हजार पोलिसांचा ताफा सज्ज ठेवण्यात आला आहे. बुधवारी रात्री अकरानंतर पोलिसांनी तपासणी मोहीम, कोम्बिंग ऑपरेशन सुरू केले आहे. वाहतूक पोलिसांचेही पथक नेमण्यात आले आहे.’’ प्रदीप रासकर, पोलिस आयुक्त


गावोगावी संपर्क
पोलिस ठाण्या-नुसार प्रत्येक गावात एक व्यक्ती पोलिस मित्र म्हणून नेमण्यात आली आहे. त्यांच्याकडून पोलिस अपडेट माहिती घेतील. कायम त्यांच्या संपर्कात राहतील. निर्भयपणे मतदान करावे.’’ मकरंद रानडे, पोलिस अधीक्षक