आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Lok Sabha Election News In Marathi, Solapur And Madha Lok Sabha Constituncy

मतदानाच्या नियोजनाला 1074 एसटी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर - गुरुवारी होणार्‍या सोलापूर व माढा लोकसभेच्या मतदानासाठी मतदान साहित्य व कर्मचार्‍यांची वाहतूक करण्यासाठी निवडणूक आयोगाने राज्य परिवहन महामंडळाच्या सोलापूर विभागाकडे 1074 गाड्यांची मागणी केली आहे. त्यानुसार एसटी महामंडळानेदेखील त्याचे तगडे नियोजन केले आहे. असे असले तरी याचा परिणाम गाड्यांच्या ठरलेल्या वेळापत्रकावर होण्याची चिन्हे आहेत. 15 आणि 16 एप्रिल रोजी एसटीच्या काही फेर्‍या रद्द कराव्या लागणार आहेत. ज्या मार्गावर जादा गाड्या सोडण्यात येतात त्या मार्गावरील काही फेर्‍या रद्द होतील. याचा फटका प्रवाशांना बसू शकणार आहे.
पोलिसांठी आहेत 93 एसटी गाड्या
15 ते 17 एप्रिलपर्यंत मतदानाच्या बंदोबस्ताची जबाबदारी असणार्‍या पोलिसांना त्यांच्या ठिकाणावरून नियुक्तीच्या ठिकाणी सोडण्याचे काम एसटीकडून करण्यात येणार आहे. त्यासाठी जवळपास 93 गाड्या राखीव ठेवण्यात आल्या आहेत.

मतपेट्यांचा व कर्मचार्‍यांचा परतीचा प्रवास
सोलापूर आगारासह विभागातील पंढरपूर, बार्शी, अक्कलकोट, करमाळा, सांगोला, अकलूज, कुर्डुवाडी आदी आगारातून गाड्या उपयोगात आणल्या जाणार आहेत.

आगारासह विभागातील
15, 16 व 17 एप्रिल रोजी 1074 गाड्या निवडणूक कामाला देणार आहे.

सोलापूर एसटी विभाग
15 व 16 एप्रिल रोजी या एसटी गाड्या मतदान केंद्रांवर कर्मचारी व मतदान साहित्य घेऊन जाण्याचे काम करतील. त्यानंतर 17 एप्रिल रोजी मतपेट्यांचा व मतदान कर्मचार्‍यांचा परतीचा प्रवासही असणार आहे. यासंबंधीचे नियोजन सुरू आहे.
दक्षता घेत आहोत
निवडणूक आयोगाच्या मागणीनुसार, त्यांना गाड्या पुरवण्यात येणार आहे. गाड्यांची संख्या कमी असल्याने ज्या मार्गावर अतिरिक्त गाड्यांच्या फेर्‍या होतात त्या कमी कराव्या लागतील. तरीही एसटी प्रशासन प्रवाशांची कमीत कमी गैरसोय होईल याची दक्षता घेईल.’’ श्रीनिवास जोशी, विभाग नियंत्रक