आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Lok Sabha Election News In Marathi, Solapur, Divya Marathi, Madha

सुरू झाली रणधुमाळी;चौथ्या दिवशी माढा, सोलापूरसाठी 17 जणांचे उमेदवारी अर्ज

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर - सोलापूर व माढा लोकसभा मतदारसंघासाठी अर्ज दाखल करण्याच्या चौथ्या दिवशी सोमवारी 17 जणांनी 28 अर्ज दाखल केले. महायुतीने बैलगाड्यांतून, ‘आप’ने झाडूने साफसफाई करत तर बसपने पक्ष चिन्ह ‘हत्ती’च्या प्रतिकृतीसह जिल्हाधिकारी कार्यालय गाठले. ‘सोलापूर’साठी भाजपचे अँड. शरदकुमार बनसोडे, बसपचे अँड. संजीव सदाफुले, ‘आप’कडून ललित बाबर यांनी अर्ज भरला. ‘माढा’साठी महायुतीचे सदाभाऊ खोत, बसपचे कुंदन बनसोडे व ‘आप’चे उमेदवार अँड. सविता शिंदे यांनी अर्ज दाखल केले.


नेत्यांची उपस्थिती
महायुतीच्या उमेदवारी अर्जावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते, खासदार राजू शेट्टी, शिवसेनेच्या नेत्या आमदार नीलम गोर्‍हे, रिपाइंचे प्रदेश उपाध्यक्ष राजा सरवदे, आम आदमी पक्षाचे व बहुजन समाज पक्षाचे स्थानिक नेते, कार्यकर्ते उपस्थित होते.

‘माढा’साठी अपक्ष अर्ज
नीलेश औदुंबर शिंदे, विक्रम वासुदेव वाळके, नितीन मारुती जगताप, सुनीता मोहन तुपसौंदर्य, विजय महादेव सगरे, संजय कृष्णराव पाटील.

‘सोलापूर’साठी अपक्ष
राजेंद्र बाबूराव नारायणकर, विक्रम उत्तम कसबे , छाया नागनाथ केवळे, शिवाजी चंद्रकांत सोनवणे, दिलीप अप्पाराव कांबळे यांनी अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केले.