आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Lok Sabha Election News In Marathi, Solapur, Divya Marathi, Vote

पाणी, उन्हाचा तडाखा अन् महिलांचा उत्साह

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर - सकाळचा स्वयंपाक, पाणी भरण्यासाठी गडबड आणि दैनंदिन कामकाज सांभाळत महिला मतदारांनी उत्स्फूर्तपणे मतदान प्रक्रियेत सहभाग घेतला. उन्हाची तीव्रता असतानाही महिलांनी मतदान केंद्र गाठून मतदानाचा हक्क बजावला. थोडीफार कसरत झाली तरी मतदानाचे कर्तव्य बजावल्याचे समाधान शहरातील महिला मतदारांच्या चेहर्‍यावर दिसत होते.


शहरातील प्रमुख मतदान केंद्रावर पुरुषांच्या बरोबरीने महिला मतदारांची संख्या लक्षणीय दिसून आली. शास्त्रीनगर, नीलमनगर, कुचन प्रशाला, शरदचंद्र प्रशाला आदी बूथवर मतदान करण्यासाठी मुस्लिम समाजाच्या महिला मतदारांची गर्दी होती. किमान 15 ते 20 महिला समूहाने येऊन मतदान करत होत्या.


विडी कामगार महिलांची सरशी : मतदान असल्याने पूर्व भागातील विडी कारखाने बंद होते. सुटीचा दिवस असल्याने महिला विडी कामगारांनी सकाळच्या सत्रात मतदानाचा हक्क बजावला. समूहाने येऊन मतदान करण्यात येत होते. त्यामुळे बहुतेक केंद्रावर मतदानासाठी गर्दी होती. मतदानानंतर कोण निवडून येणार, याची चर्चा रंगली होती.