आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Lok Sabha Election News In Marathi, Sushilkumar Shinde, Home Minister, Divya Marathi

प्रचारकल्लोळ आज संपणार, मतदानाची घटिका समीप.!

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर - गेल्या 17 दिवसांपासून पेटलेले लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराचे रान आज सांयकाळी पाच वाजता शांत होईल. जाहीर सभा, पदयात्रा आणि घरोघरी मतदारांच्या गाठीभेटींना पूर्णविराम लागेल. आज प्रचार संपणार आहे. गुरुवारी मतदान आहे. प्रशासन यंत्रणा आणि राजकीय पक्षही तयारीला लागले आहेत.


केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे 9 एप्रिलपासून सोलापुरात तळ ठोकून आहेत. उद्या बलिदान चौकापासून पदयात्रा काढून ते प्रचाराची सांगता करतील. दुपारी एक वाजता काँग्रेस भवनात पत्रकार परिषद होणार असून त्यात ते कोणती घोषणा करतात याकडे लक्ष लागले आहे. महायुतीचे उमेदवार शरद बनसोडे यांचीही उद्या पदयात्रा होणार आहे. जाहीर सभांचेही प्रयोजन आहे. भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांच्या जाहीर सभेनंतरच्या वातावरणाचा प्रभाव कायम टिकवण्याचा भाजपचा प्रयत्न आहे. आम आदमी पक्षातर्फे सोमवारी अंजली दमानिया यांनी व्यापार्‍यांशी संवाद साधला. मंगळवारी उमेदवार ललित बाबर पदयात्रा आणि जाहीर सभेने प्रचाराची सांगता करतील.


माढय़ातही प्रचार शिगेला
माढा लोकसभा मतदार संघातील प्रचाराचा समारोपही जाहीर सभा आणि पदयात्रांनी होणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार विजयसिंह मोहिते नातेपुते येथे दुपारी चार वाजता पदयात्रेने प्रचाराचा समारोप करतील. अपक्ष उमेदवार प्रतापसिंह मोहिते अकलूज या होमपीचवर जाहीर सभा घेऊन प्रचाराची सांगता करणार आहेत.