आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Lok Sabha Election News In Marathi, Sushilkumar Shinde, Vijaysinh Mohite

सोलापुरात 57, माढय़ात 62 टक्के; शिंदे, मोहितेंचे भवितव्य मतयंत्रात बंद

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर - सोलापूर आणि माढा लोकसभा मतदारसंघात मतदानाचा फारसा उत्साह दिसून येत नव्हता. सकाळी पहिल्या टप्प्यात तर केवळ 15 टक्केच मतदान झाले होते. दुपारनंतर ते वाढले. सोलापुरात प्राथमिक माहितीनुसार, सरासरी 57 टक्के तर माढय़ात 62 टक्के मतदानाची नोंद झाली आहे.


सोलापूर लोकसभा मतदारसंघातून काँग्रेसचे सुशीलकुमार शिंदे, तर माढा लोकसभा मतदार संघातून राष्ट्रवादी काँग्रेसचे विजयसिंह मोहितेंचे भवितव्य गुरुवारी मतयंत्रात बंद झाले. महायुतीकडून अनुक्रमे भाजपचे शरद बनसोडे व स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे सदाभाऊ खोत त्यांच्याविरुद्ध रिंगणात आहेत. बहुजन समाज पक्ष व आम आदमी पक्षानेही दोन्ही मतदारसंघात उमेदवार दिले आहेत. पण खरी लढत झाली ती काँग्रेस आघाडी आणि महायुतीतच.


माढय़ातून विजयसिंहांचे बंधू प्रतापसिंह मोहिते यांनीही राजकीय वातावरण ढवळून काढले आहे. गुरुवारी सकाळी सात ते नऊ दरम्यान सोलापुरात 14 तर माढय़ात 17 टक्के इतकेच मतदान झाले होते. त्यानंतर हळूहळू टक्का वाढत गेला. दुपारी चारनंतर मतदानाला वेग आला. गृहमंत्री शिंदे यांनी पत्नी उज्‍जवला शिंदे, कन्या, आमदार प्रणिती शिंदे यांच्यासह नेहरू नगर येथील मतदान केंद्रावर मतदान केले, तर मोहिते यांनीही सहकुटुंब अकलूज येथे मतदान केले. बनसोडे यांनी पानमंगरूळ या गावी मतदानाचा हक्क बजावला.