आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Lok Sabha Election News In Marathi, Unemployment, Lok Sabha Election, Divya Marathi

प्रचार रिंगणात आले तरुणाईला उधाण

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - निवडणुकीची धामधूम सुरू आहे. घरोघरी जाऊन उमेदवार नेत्यांचे काम आणि पक्षाचे महत्त्व समजावून देण्यासाठी तरुणाई आटापिटा करत आहे. बेरोजगार तरुण-तरुणींसाठी हंगामी रोजगार मिळण्याचा काळ असल्याने तरुणाईचा उत्साह वाढला आहे. प्रत्यक्षात चळवळ म्हणून अथवा तळमळ म्हणून राजकारणात येणारे युवक-युवती कमीच असले तरी ही तरुणाई प्रचाराचे वाट्टेल ते काम मोठय़ा प्रमाणावर करत आहे. त्यामुळे आम्हाला राजकारणात इंट्रेस्टच नाही असे म्हणणार्‍या युवक-युवतींच्या संख्येत वाढ घट होतेय आणि त्याचा प्रयत्यय सोलापूर लोकसभा निवडणुकीच्या विविध पक्ष प्रचारात पाहावयास मिळत आहेत.
कौतुक वाटते
मोठय़ा प्रमाणावर तरुणाई ही काम करते आहे. पदयात्रा प्रचार सभा, बैठका, कॉनर्र सभा प्रत्यक्ष भेटणे ही काम तरुणाई उत्तमरीत्या करत आहे. त्यामुळे तरुणाईचे कौतुक करावे तितके कमी आहे. अमोल शिंदे, लोकसभा युवक अध्यक्ष
कार्यकर्त्यांमध्ये वाढ
युवक युवतींची मोदींसाठी वाटे्ल ते करण्याची तयारी आहे. नव्याने येणा--या कार्यकर्त्यांच्या संख्येत वाढ होत आहे ते खुप काम करत आहेत. तरूणाईचा सध्याच्या राजकारणाकडे पाहण्याचा दृष्टीकोन बदलला आहे असे म्हंटले तर वावगे ठरणार नाही आ. विजयकुमार देशमुख, भाजपा
यात मी पडणार नाही
राजकारण हे जोपर्यत पारदर्शक होत नाही तोपर्यत त्यांच्याकडे पाहण्याचा दृष्टकोन बदलणार नाही. प्रचार पदयात्रा हे सर्व प्रकार ठीक आहेत मात्र ज्या नेत्यांच्या प्रचाराचे सर्मथन करत त्यांचा प्रचार आपण करणार आहोत तो खरंच लायक आहे, का याचा विचार मी नक्की करतो, त्यामुळे या विषयात न पडण्याचे मत स्पष्ट आहे. सचिन जाधव, युवक
सकारात्मक दृष्टीने पाहा
राजकारणाकडे जर वाईट दृष्टीने पाहिले तर ते वाईटच दिसते मात्र सध्याच्या राजकारणात तरुणाईने सहभाग घेतला तर त्यात बदल होण्यास वेळ लागणार नाही. मात्र सुरुवात होणे गरजेचे आहे. भाग्यश्री केंदळे , युवती