आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

स्तुत्य उपक्रम: निराधारांसाठी शोधण्यात येणार रद्दीतून मार्ग

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर- लोकमंगल समूहाच्या वतीने वंचित विकास योजनेचे उद्घाटन करण्यात आले आहे. ही योजना शहरातील गरीब, महिला, विद्यार्थी आणि वृद्धांना विविध सामाजिक उपक्रमांच्या माध्यमातून अर्थसाहाय्य करणार आहे. त्यामुळे गरीब, विद्यार्थी, वृद्ध आणि महिला यांना मोठय़ा प्रमाणावर दिलासा मिळणार आहे.
नागरिकांचा वाटा महत्त्वाचा
या योजनेच्या माध्यमातून संस्थापक सुभाष देशमुख यांनी आपल्या या योजनेला जनसामान्याची मदत करण्याचे आवाहन केले आहे. सोलापूर शहराच्या विविध भागातून जी रद्दी जमा होणार आहे. त्या रकमेत आणखी रक्कम समाविष्ट करून त्याचा लोकमंगल विधायक कामासाठी उपयोग करणार आहे.
लोकमंगल समूहाच्या वतीने वंचित विकास योजनेचे उद्घाटन
अशी आहे योजना
वंचित विकास योजना ही संकल्पना, लोकमंगलने वंचितांच्या हितासाठी सुरू केली आहे. या योजनेअंतर्गत प्रत्येक स्वयंसेवक हा शहर व परिसरातील घराघरामध्ये जाऊन रद्दी जमा करून तीच्या विक्रीतून जी काही रक्कम येणार आहे. त्यातून वंचितांच्या समाजोपयोगी कामासाठी अथवा विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी आणि विविध प्रकारच्या कामासाठी व वैयक्तिक साहाय्यासाठी काम करणार आहेत.
हा असणार मुख्य हेतू
निराधार वृद्धांना मोफत भोजन, वंचितांना अर्थसाहाय्य, गरीब विद्यार्थ्यांना शालेय साहित्य या कामावर अधिक भर देणार आहे. तर वंचित विकास योजनेच्या माध्यमातून गरीब व्यक्तीवरील शस्त्रक्रिया, एखाद्या घटनेनंतर आर्थिक मदत देणे असे अनेक समाजिक कार्यक्रम, उपक्रम अशा विधायक कामाचा यात समावेश असणार आहे.
अशी असणार मदत
ज्या त्या व्यक्तीच्या गरजेनुसार अथवा घटनेनुसार किती आर्थिक मदत करावयाची आहे. याचे काम योजनेचे कर्मचारी करणार आहेत. एखाद्याला मोठी रक्कम लागत असेल तर ती कोणत्या पद्धतीने देण्यात येईल, याचाही विचार केला जाणार आहे.
एका सामाजिक कार्यकर्त्याने सुचवलेला हा उपाय
हा एका सामाजिक कार्यकर्त्याने सुचवलेला उपाय आहे. जर या योजनेच्या माध्यमातून काहीअंशी समाजाला मदत करण्याचे भाग्य मिळत असेल तर ते करण्याची इच्छा ठेवून आम्ही ही योजना सुरू केली आहे. त्यास सोलापूरकरांनीही भरभरून दाद दिली आहे.’’ सुभाष देशमुख, संस्थापक, लोकमंगल समूह