आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

साहित्यरत्न अण्णा भाऊ साठेंची जयंती मिरवणूक, युवकांसह महिलांचाही सहभाग

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर- जग बदल घालुनी घाव, सांगून गेले मला भीमराव’ अशी क्रांतीची घोषणा करणारे थोर साहित्यिक, लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या 93 व्या जयंती उत्सवाची सांगता रविवारी मिरवणुकीने झाली. भीमशाहिरांची पहाडी आवाजातील गाणी, डीजेच्या तुफानी आवाजाने मिरणुकीत उत्साह संचारला.

दुपारी चारच्या सुमारास मिरवणुकीची सुरुवात झाली. तीत आर. के. प्रतिष्ठान, ए. एस. ग्रुप, बहुजन रयत परिषदेचे सदस्य, के. डी. ग्रुप, यु. के. मित्न परिवार, दलित महासंघ, साहित्यरत्न युवक प्रतिष्ठान, वीर फकिरा प्रतिष्ठान, एकता ग्रुप, जयभवानी ग्रुप, लहुजी प्रतिष्ठान, एस. एस. मित्र परिवार आदी सहभागी झाले.

प्रारंभी महापौर अलका राठोड, पोलिस आयुक्त प्रदीप रासकर, मध्यवर्ती उत्सव समितीचे अध्यक्ष उत्तमप्रकाश खंदारे, नगरसेवक आनंद चंदनशिवे, मिरवणूक प्रमुख बबन जोगदंड, शिवसेना जिल्हाप्रमुख लक्ष्मीकांत ठोंगे-पाटील, हणमंतू पवार, भैरू लोंढे, संजय कांबळे, साक्षात लोखंडे, सतीश बगाडे यांच्या उपस्थितीत अण्णांच्या पुतळ्यास अभिवादन करण्यात आले.

माझा रशियाचा प्रवास
भय्या चौकातील पुतळ्यासमोर ‘माझा रशियाचा प्रवास’ असा प्रबोधनात्मक फलक लावण्यात आला होता. त्यावर अण्णा भाऊ साठेंनी त्याकाळात केलेल्या रशियन प्रवासातील एक किस्सा लिहण्यात आला होता. तर त्यावर लष्कर परिसरातील चित्रकार संजीव केंदळे यांनी अण्णांचे सुबक चित्र रेखाटले होते.

नमफलकाचे अनावरण
भय्या चौकात अण्णांच्या पूर्णाकृती पुतळ्यासमोरील भागात महापौर अलका राठोड, पोलिस आयुक्त प्रदीप रासकर यांच्या हस्ते ‘साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे चौक’ या नामफलकाचे अनावरण झाले. मिरवणुकीत प्रत्येक मंडळाने उत्कृष्ठ पद्धतीने चित्नरथ सजवले होते. पण यू. के. आणि एस. एस.चे चित्ररथ कृत्रिम लायटिंगच्या फुलांनी सजवण्यात आले असल्याने वेगळेपण जाणवत होते.

हलगी, उंट, घोडे व झेंडे
यू. के. ग्रुपच्या मिरवणुकीत अग्रभागी उंट व घोड्यावर सिल्क कापडाचे पंचरंगी झेंडे घेऊन मुले बसली होती. त्याच्यामागे मंडळाचा डीजे आणि चित्ररथ होता. ही मिरवणूक सर्वांचे लक्ष वेधून घेत होती.

हेलिकॉप्टरने पुष्पवृष्टी
मातंग क्रांती युवा मंचच्या वतीने हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टी करण्यात आली. शहरातील शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि अण्णा भाऊ साठे यांच्या पुतळ्यांवर फुले उधळण्यात आली. त्यानंतर मिरवणूक मार्गावर पुष्पवृष्टी झाली. या वेळी मातंग क्रांती युवा मंचचे संस्थापक अध्यक्ष मल्लिकार्जुन कांबळे उपस्थित होते.