आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

काकीनाडा एक्स्प्रेसवर दरोड्याचा प्रयत्न

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - भावनगर-काकीनाड एक्स्प्रेसमध्ये रविवारी रात्री पुणे - दौंडदरम्यान २० ते २५ अज्ञात व्यक्तींनी सिनेस्टाइल दहशत निर्माण करत प्रवाशांना मारहाण केली. या प्रकाराने घाबरलेल्या प्रवाशांनी पोलिस संरक्षण मिळावे अशी मागणी करत सोलापूर रेल्वे स्थानकावर १२ वेळा चेन पुलींग करून दोन तास गाडी रोखून धरली. अखेर पोलिस संरक्षण मिळाल्यानंतर गाडी मार्गस्थ झाली. पहाटे ३ ते ५ या वेळेत हा गोंधळ सुरू होता.

पुणे येथील ५०० जणांचा ग्रुप विजयवाड्याला निघाला होता. त्यांनी ग्रुप बुकिंग केले होते. पुणे येथून काकीनाड एक्स्प्रेस रात्री अकरा वाजता मार्गस्थ झाली. तेव्हा एस-१ या आरक्षित डब्यात दोन ते तीन अज्ञात व्यक्तीनी प्रवेश मिळविला.

कमलेश जैन या प्रवाशांस गाडीत शिरलेल्या त्या व्यक्तींचा संशय आला. त्यांनी त्यास हटकले. हटकल्यानंतर जैन आणि त्या व्यक्तीमध्ये हमरीतुमरी झाली. त्याचे पर्यावसान मारामारीत झाले. गाडीतील प्रवाशांनी मारहाण करणा -या ज्ञानेश्वर महादेव यादव (वय २९, बालाजीनगर, दौड) व दादु गोविदराव रोटे (वय २२, उत्सव अपार्टमेंट, दौड) या दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतले.