आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बाप्पाचे रूप लोभसवाणे सोनेरी, रूपेरी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - सोन्या-चांदीच्यागणेशमूर्ती, आभूषण सजावटीच्या वस्तू यांनी बाजारपेठ नटली आहे. सोन्याच्या २० ग्रॅमच्या मूर्ती तर चांदीच्या हव्या त्या आकाराच्या मूर्ती उपलब्ध आहेत. सोनेरी-रूपेरी बाप्पांचे रूप लोभसवाणे असून या मूर्ती घेण्याकडे उच्चभ्रू कुटुंबीयांचा कल वाढला आहे.
नेहमी विविध पूजांमध्ये वापरण्यात येणाऱ्या गणेशाची मूर्तीही कायम मंदिरात ठेवून काही कुटुंबीय हे केवळ गणेशोत्सवाच्या काळात पुन्हा वेगळ्या ठिकाणी बाप्पांचे सोवळ्या अथवा मकरात बसवून त्यांची अकरा दिवस त्याची पूजा करतात. अनेक कुटुंबे चांदी-सोन्याच्या मूर्तीना अधिक पसंती देत आहेत.
कल्चरलमार्बलच्या मूर्तींनाही पसंती
नैसर्गिकअशा घटकापासून कोरलेल्या कल्चरल मार्बलच्या मूर्ती २४ कॅरेट गोल्ड प्लेटेडमध्ये सुंदर आहेत. याच्या किमती किमान ६०० ते एक लाखापर्यंत आहेत. कायमस्वरूपी मूर्ती घरी ठेवता येत असल्याने यांनाही मागणी आहे.
अभिरूची बदलत आहे
उत्सवाच्याकाळात लोकांच्या आवडीनिवडी बदलत असल्याचे लक्षात येते. जुन्या नव्याचा संगम ठेवत ते अभिरूची बदलत आहेत. उत्सवाच्या भावना बदललेल्या नाहीत. चांदीच्या मूर्ती, आभूषणे खरेदी करणाऱ्या ग्राहकांचे प्रमाण वाढले आहे.” महेशआपटे, सराफ
गणेशोत्साची धामधूम सुरू झाली आहे. त्यािनमित्ताने सराफांकडे विविध प्रकारच्या मूर्ती विक्रीसाठी तयार केलेल्या आहेत. त्यात सोने-चांदीच्या अशा मूर्तींचा समावेश आहे.
आभूषणांचे प्रकार
सोने-चांदीचेमोदक, जास्वंदीच्या मीना वर्क केलेल्या फुलांचा हार, दुर्वाचा हार, झुल, झुलांचा हार, शस्त्रामध्ये त्रिशूल, परशू, बाजूबंद , सिल्व्हर बट गोल्ड प्लेटेड आसन, तोरणाचे विविध प्रकार, फळे, फुलांचे हार आदी आहेत.