आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आजही गायली जाते स्वातंत्र्यपूर्व काळातील गणपतीची आरती

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर - स्वातंत्र्यपूर्वकाळात सार्वजनिक गणेशोत्सवाची संकल्पना रुजवण्याचा काहीसा प्रयत्न पत्रा तालीम गणपती मंडळाने सुरू ठेवला आहे. आजही या मंडळात प्रत्येक चतुर्थीला स्वातंत्र्यपूर्व काळातील पारंपरिक आरती गायली जाते. मंगळवारी अंगारकी चतुर्थी साजरी करीत असतानाच या मंडळाच्या उपक्रमाला ९६ वर्षे पूर्ण होत आहेत. पत्रा तालीम युवक क्रीडा सास्कृतिक मंडळाची स्थापना १९१८ मध्ये झाली. जगन्नाथ परदेशी (मास्तर) यांचा याकामी पुढाकार होता. त्यानंतर ही जबाबदारी विठोबा दुधाळ, विठ्ठलराव कोलारकर, बलभीम जाधव, बहादूरजी घाडगे, लक्ष्मण फडके, नारायण काकडे, भगवान शिंदे खलिफा यांनी पुढे चालवली. सुरुवातीला अगदी छोटी मूर्ती आणि छोटासा पत्र्याचा मंडप असायचा. त्यावेळी श्री गणपती महाराजा, आम्ही करतो तुमची पूजा, श्रावण गेले धावुनी, लिंग पाहतो उकलूनी, अशी पारंपरिक आरती म्हटली जायची. आताही रूढ झालेल्या जय देव जय देव जय मंगलमूर्ती या आरती बरोबर पूर्वीची पारंपरिक आरती म्हटली जाते.
लोकमान्य गणेशोत्सवाची स्थापना सुरुवातीला ११ फूट मूर्ती बसवून गणेशोत्सव साजरा करणारे हे मंडळ पुढे महामंडळ बनले. सगळ्यात मोठी मूर्ती १९७८ मध्ये बनवण्यात आली आणि लोकमान्य गणेशोत्सव महामंडळाची स्थापनाही झाली. १९८२ ला खास मुंबईहून पीओपीची आणि याच मूर्तीला मोल्ड करून याच परिसरात राहणारे मूर्तिकार मच्छिंद्र यादव यांनी सोलापुरात पहिल्यांदाच फायबरची मूर्ती बनवली

मंडळाचे झाले महामंडळ
१९१८मध्ये या मंडळाची स्थापना झाली सध्या याच्या अधिपत्याखाली १५० ते १६० मंडळांचा सहभाग आहे. आता काळानुरूप इलेक्ट्रॉनिक देखावे, सजीव देखाव्यांचे सादरीकरण तसेच वर्षभर सामाजिक उपक्रम राबवले जातात. सोलापूरकरांच्या डोळ्याचे पारणे फेडणारे लेझिमपथक, टिपरी पथक यांचा समावेशही या मंडळात असतो.
यांचा पुढाकार महत्त्वाचा
स्व.देविदास घाडगे, स्व. मुरलीधर घाडगे, मन्नीमहाराज परदेशी, एकनाथ जाधव, शंकर ढंगेकर, नारायण काळे, अंबादास बन्ने, अर्जुनराव सुरवसे, कृष्णात दुधाळ, शिवाजी घाडगे, दत्तात्रय कोलारकर, भीमराव होनपारखे, लक्ष्मण गायकवाड या पत्रा तालिमच्या नामवंतांचा तर आज नगरसेवक राजाभाऊ खराडे, पद्माकर काळे, महेश गादेकर, श्रीकांत घाडगे, सुहास कोलारकर, सतीश कोलारकर, सचिन शिंदे, प्रवीण इरकशेट्टी, मधुकर जाधव, गणेश भुरळे, अमर दुधाळ, उमाकांत घाडगे, देविदास घुले, गणेश शेळके हे धुरा सांभाळत आहेत.