आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुखदर्शन व्यवस्था जवळ नेण्याचा विचार

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पंढरपूर - श्रीविठ्ठलाच्या पदस्पर्श दर्शन रांगेतील गर्दी कमी होण्यासाठी सध्याच्या ठिकाणापेक्षा मुखदर्शन व्यवस्था आणखी जवळ नेता येईल का या संदर्भात सध्या विचार सुरू आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी तुकाराम मुंढे यांनी दिली.

जिल्हाधिकारी तुकाराम मुंढे यांनी गुरुवारी (ता.2) श्री विठ्ठल मंदिरास भेट दिली. या वेळी त्यांनी मंदिरातील पददर्शन रांग तसेच मुखदर्शन रांगेची प्रांताधिकारी संजय तेली, मंदिराचे कार्यकारी अधिकारी शिवाजी कादबाने, तहसीलदार गजानन गुरव, मंदिराचे व्यवस्थापक विलास महाजन आदी समवेत पाहणी केली. त्या नंतर पत्रकारांशी बोलताना त्यांनी ही माहिती दिली.

मुंढे म्हणाले, श्री विठ्ठलाच्या पददर्शन रांगेतील भाविकांची गर्दी कमी होण्यासाठी श्री विठ्ठलाचे मुखदर्शन सध्याच्या ठिकाणा पासून आणखी जवळुन कसे होईल याची सध्या मंदिरात पाहणी केली जात आहे. जर भाविकांनी मुखदर्शन आणखीन जवळुन मिळाले तर भाविकांची पददर्शनाची रांग निश्चित कमी होण्यास मदत होईल. जर पददर्शनाची रांग लांब असेल तर भाविकांना चांगल्या प्रकारे श्री विठ्ठलाचे मुखदर्शन झाल्याचे समाधान मिळु शकेल. त्यामुळे अशा प्रकारे मुखदर्शन कसे सोयीस्कर होईल. त्या दृष्टीने मंदिराची पाहणी करुन त्या संदर्भात विचार विनीमय सुरु आहे.
या बरोबरच आषाढी यात्रा काळात नाशिक तसेच मराठवाडा विभागातून आलेली मोठी आणि जड वाहनांच्या पार्किंगची सोय अनुक्रमे नवीन पुला जवळ तसेच जुन्या दगडी पूलाजवळ झाली तर भाविकांना शहरा मध्ये येण्यासाठी फारसे अंतर पायी चालावे लागणार नाही. त्यामुळे या दृष्टीने देखील काय करता येईल, कोठे पार्किंगची व्यवस्था करता येईल याची देखील चाचपणी केली जात असल्याचे त्यांनी सांगितले.

जिल्हाधिकारी म्हणतात
यात्रेत पहिल्यांदाच आयआरएस प्रणालीचा वापर करणार. दर्शन मंडपातील भाविकांना मंदिर समितीकडून मोफत चहा देण्यात येणार. एकूण चौदा नियंत्रण कक्ष उभारणार. यात्रेसाठी येणाऱ्या भाविकांची अधिकाधिक सोय व्हावी यासाठी प्रशासन प्रयत्नशील.