आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Lord Vitthal Rukhmini Marriage Ceremony Completed

श्री विठ्ठल - रुक्मिणी विवाह सोहळा थाटात पार पडला

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पंढरपूर - श्री विठ्ठल : रुक्मिणी मंदिर समितीच्या वतीने शनिवारी (दि. २४) श्री विठ्ठल - रुक्मिणी विवाह सोहळा मोठ्या उत्साहात व थाटामाटात पार पडला. विवाह सोहळ्यानिमित्त मंदिरात पाच दिवस विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. यात श्रीमद्भागवत कथा आणि प्रवचनकार अनुराधा शेटे यांची विठ्ठल - रुक्मिणी विवाह सोहळ्यानिमित्त कथा याचा समावेश होता.
रामकृष्ण महाराज वीर, भानुदास रामचंद्र यादव महाराज, बाळासाहेब महाराज देहूकर यांचे प्रवचन झाले. तसेच महिला भजन मंडळांचे भजन झाले. शनिवारी विवाह सोहळा पार पडला. श्री विठ्ठल - रुक्मिणी मातेची मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी शिवाजी कादबाने यांच्या हस्ते पूजा झाली. या वेळी मंदिर समितीचे सदस्य वसंत पाटील, व्यवस्थापक विलास महाजन यांच्यासह भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.