आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कंटेनरचा एसी बंद ठेवला; १४ लाखांच्या द्राक्षांचे नुकसान

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर- सोलापूरहून दिल्लीला द्राक्षे नेताना कंटेनरचा एसी बंद ठेवला. त्यामुळे चौदा लाख किमतीच्या द्राक्षांचे नुकसान झाल्याचा प्रकार उघडकीला आला आहे. आनंद गोविंद खंडेलवाल (रा. ढंगे रेसीडेन्सी, शेळगी) यांनी फौजदार चावडी पोलिसात फिर्याद दिली आहे. मंगेश पाठक, अमोल भोपाळकर, रवींद्र कारंडे, रमेश भाटिया, ललीतकुमार (रा. सर्वजण मुंबई) यांच्यावर गुन्हा दाखल झाला. हे सर्वजण ट्रान्सपोर्ट चालक आहेत.
खंडेलवाल यांनी त्यांच्या एसी कंटेनरमधून अकरा एप्रिल रोजी दिल्लीला द्राक्षे पाठवली होती. ठरलेल्या भाड्यापेक्षा जास्त भाडे दिल्यामुळे जाणीवपूर्वक कंटेनरचा एसी बंद ठेवला. त्यामुळे नुकसान झाल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. याबाबत सहाय्यक पोलिस निरीक्षक रणजित माने यांना विचारले असता, अद्याप कुणाला अटक नाही. तपास सुरू केल्याचे सांगितले.