आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विद्यापीठातील एम. ए. शिक्षणशास्त्र होणार बंद

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर - विद्यापीठ अधिविभागातील 60 विद्यार्थ्यांची प्रवेश क्षमता असणारे एम.ए. शिक्षणशास्त्र अभ्यासक्रम बंद करण्याबाबत हालचाली सुरू आहेत. 20 एप्रिल रोजी आयोजित विद्या परिषदेच्या बैठकीत यावर शिक्कामोर्तब होईल. एम. ए. शिक्षणशास्त्र हा अभ्यासक्रम व्यावसायिकदृष्ट्या तितकासा उपयुक्त नसल्याने विद्यार्थ्यांनी याकडे पूर्णत: पाठ फिरविली आहे. यंदा एकाही विद्यार्थ्याने प्रवेश घेतला नाही. गतवर्षी 15 विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला होता. एम.ए. शिक्षणशास्त्र हा अभ्यासक्रम जिल्ह्यात बार्शी व सोलापूर विद्यापीठ अधिविभाग येथेच सुरू आहे. येत्या शैक्षणिक वर्षापासून विद्यापीठातील अभ्यासक्रम बंद करण्याचा निर्णय होईल.

प्रस्ताव दिला आहे
विद्यार्थी नसल्याने एम.ए. शिक्षणशास्त्र अभ्यासक्रम बंद करण्याचा प्रस्ताव देण्यात आला आहे. विद्या परिषदेत यावर निर्णय होईल.’’ डॉ. एच. एन. जगताप, संचालक, शिक्षणशास्त्र विभाग, विद्यापीठ