आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Made Effort For Giving Status Of Minority To Lingayat Community Sushilkumar Shinde

लिंगायत समाजाला अल्पसंख्याक दर्जा देण्यासाठी प्रयत्न करू - सुशीलकुमार शिंदे

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर - जैन समाजाप्रमाणेच महाराष्‍ट्रात वीरशैव लिंगायत समाजाला अल्पसंख्याक समाजाचा दर्जा मिळवून देण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करू, अशी ग्वाही केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी रविवारी दिली.


ऑल इंडिया वीरशैव महासभा महाराष्‍ट्र विभागाच्या वतीने रविवारी वीरशैव लिंगायत महासंमेलन आयोजित करण्यात आले होते. या वेळी कर्नाटक व महाराष्टातील आमदार व खासदार तसेच मान्यवरांची उपस्थिती होती. अध्यक्षीय भाषणात शिंदे म्हणाले, गेल्या 10 ते 15 वर्षांपासून वीरशैव समाजाला अल्पसंख्याक दर्जा मिळावा म्हणून प्रयत्न चालू आहेत. मी देखील त्यासाठी प्रयत्नशील आहे. गरज पडल्यास महाराष्‍ट्राच्या मुख्यमंत्र्यांशी या विषयी चर्चा करेन. मात्र समाजाचे काम करणा-यांनीही याचा पाठपुरावा केला पाहिजे. मंत्र्यांना निवेदन दिले म्हणजे आपले काम झाले, असे नाही, असा चिमटा त्यांनी काढला.