आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Madha Lok Sabha Constituncy News In Marathi, Ramdas Athawale, Sharad Pawar

विजयी उमेदवाराला भरघोस मताधिक्य दिले ‘माढा’ने

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर - गेल्या तीन निवडणुकीत माढा (पूर्वीचा पंढरपूर) लोकसभा मतदारसंघात रिपाइंचे अध्यक्ष रामदास आठवले आणि नंतर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार मोठय़ा फरकाने विजयी झालेले दिसतात.पंढरपूर मतदारसंघ प्रारंभी शेतकरी कामगार पक्षाचा बालेकिल्ला होता. पुढे काँग्रेसने वर्चस्व मिळवले. 1999 मध्ये शरद पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना केली. त्यामुळे माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते यांच्यासह बरीच मंडळी राष्ट्रवादीत आली. 1999 ला पवारांनी पंढरपूरची जागा रिपाइंचे अध्यक्ष रामदास आठवले यांच्यासाठी सोडली. आठवलेंना 4 लाख 13 हजार 115 तर भाजपचे उमेदवार नागनाथ क्षीरसागर 1 लाख 53 हजार 610 मते मिळाली. आठवले 2 लाख 59 हजार 505 मतांनी निवडून आले होते, यामध्ये राष्ट्रवादीचा महत्त्वाचा वाटा होता. 2004 च्या निवडणुकीत आठवले विरुद्ध क्षीरसागर अशी लढत झाली. आठवले 99 हजार 693 मतांनी निवडून आले. येथे आठवलेंचे मताधिक्य घटले, पण मतांच्या टक्केवारीत फारसा फरक पडला नाही.


2009 च्या पुनर्रचित मतदारसंघानुसार माढा मतदारसंघाची निर्मिती झाली. यामध्ये पंढरपूर मतदारसंघातील बहुतांश भागाचा समावेश झाला. नव्याने फलटण, माण हे तालुके आणि खटाव, कोरगाव तालुक्यातील काही भाग जोडण्यात आला. हे सर्व तालुके राष्ट्रवादीबहुल असल्याने 2009 मध्ये राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना विक्रमी मतदान झाले. पवारांना सरासरी 58 टक्के मते मिळाली होती.


1999 पंढरपूर
रामदास आठवले (रिपाइं) (राष्ट्रवादीसोबत युती)
मिळालेले मतदान : 4,13,115
टक्केवारी : 52.91 टक्के
2004 पंढरपूर
रामदास आठवले (रिपाइं) (राष्ट्रवादीसोबत युती)
मिळालेले मतदान : 3,47,215
टक्केवारी : 50.38 टक्के
2009 : माढा
शरद पवार (राष्ट्रवादी)
मिळालेले मतदान : 5,30, 596
टक्केवारी :58 टक्के