आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Madhav Bhandari News In Marathi, BJP, Madha Lok Sabha Election, Divya Marathi

बिअर तयार करायला पाणी, मग शेतीसाठी का देत नाही - भंडारी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कुर्डुवाडी - माढा लोकसभा मतदारसंघात शरद पवारांनी गेल्या पाच वर्षांत 47 टक्के खासदार निधी खर्च केल्याचे कागदावर दाखवले आहे. मात्र. प्रत्यक्षात वीज, पाणी, रस्ते हे प्रश्‍न सुटलेच नाहीत. तसेच बिअर तयार करण्यासाठी पाणी दिले जाते, मग शेतकर्‍यांना का पाणी दिले जात नाही, असा सवाल भाजपचे प्रवक्ते माधव भंडारी यांनी केला. माढा लोकसभा मतदार संघातील महायुतीचे उमेदवार सदाभाऊ खोत यांच्या प्रचारार्थ येथे आयोजित जाहीर सभेत भंडारी बोलत होते.
भंडारी म्हणाले, ‘खोत हे येरवडा जेलमध्ये असते, असे विधान राज्याचे गृहमंत्री करत आहेत. परंतु आता माढय़ातील जनता खोत यांना दिल्लीमध्ये पाठवून आपली ताकद दाखवेल. तसेच या मतदारसंघाचा विकास तर झालाच नाही. या ठिकाणच्या रस्त्यांची स्थिती बिकट आहे. मग 25 कोटींचा खासदार निधी कोठे खर्च केला, हा जाब विचारण्याची वेळ आली आहे.’
उमेदवार खोत म्हणाले, ‘सिंचन घोटाळा केला नसल्याचे अजित पवार सांगत आहेत. त्यांची नार्को चाचणी झाल्यास सत्य बाहेर येईल. सताधार्‍यांनी जनतेचा विश्वासघात केला आहे. गारपिटीमुळे आत्महत्या केलेल्या शेतकर्‍यांच्या कुटुंबांना भेटी देण्यासाठी पालकमंत्र्यांकडे वेळ नाही. मी माढा मतदारसंघ हा विकासाचा मॉडेल बनवेन. मतदारांनी निवडून द्यावे.’ या वेळी बापूसाहेब जगताप, संजय पाटील-घाटणेकर, बाळासाहेब धाईंजे, नागेश कांबळे, नामदेव हंडे, राजेंद्र पारखे यांनीही मार्गदर्शन केले. याप्रसंगी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख धनंजय डिकोळे, राजकुमार पाटील, गोंविद कुलकर्णी, अरविंद पवार, नगराध्यक्षा शुभांगी श्रीरामे, कुमार गव्हाणे, प्रशांत धर्मराज यांची प्रमुख उपिस्थती होती.
खोत म्हणाले,
0 ‘माढय़ात राष्ट्रवादी काँग्रेसचे मंत्री प्रचारात उतरल्याने ‘वर्‍हाड निघालंय लंडन’ला अशी स्थिती निर्माण झाली आहे.
0 व्हॉट्स अँपवर जातीविषयी अपप्रचार सुरू आहे. मात्र, मी कोणत्याही जाती-धर्माचा नाही.’
मी खासदार असताना माढा मतदारसंघात अनेक विकासकामे केल्याचे सांगून खासदार रामदास आठवले म्हणाले, ‘नरेंद्र मोदी हे पंतप्रधान आणि मी मंत्री होणार आहे. मी मंत्री नाही तर मोदी पंतप्रधान नाहीत. मी महाराष्ट्राचा लालू आहे तर राज ठाकरे राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेसचा भालू आहे.