आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

शाहरूखच्या ‘चेन्नई एक्स्प्रेस’पेक्षा 153 वर्षांपूर्वी धावली मद्रास पॅसेंजर

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर - अभिनेता शाहरूख खान व अभिनेत्री दीपिका पादुकोन यांच्या ‘चेन्नई एक्स्प्रेस’ची सर्वत्र धूम आहे. शाखरूख खानची ‘चेन्नई एक्स्प्रेस’ जरी आजपासून संपूर्ण भारतभर धावणार असली तरी सुमारे 153 वर्षांपूर्वी म्हणजे 1860 मध्ये मुंबईहून मद्रासकडे जाणारी पॅसेंजर सोलापुरातून धावली होती. दरम्यानच्या काळात म्हणजेच 6 जून 1860 रोजीच यानिमित्ताने रेल्वेच्या नकाशावर प्रथमच सोलापूर आले. त्याकाळी सोलापुरात मद्रास पॅसेंजरची चांगलीच धूम होती.

भारताच्या सुवर्ण चतुष्कोनमधील मुंबई व मद्रास या दोन शहरांना जोडणारा महत्त्वाचा मार्ग समजला जातो. दोन महानगरांना रेल्वे मार्गाने मुंबई-मद्रास पॅसेंजरने जोडले गेल्याने दोन्ही शहरांतील औद्योगिक, सांस्कृतिक भावबंध अधिक गतीने वाढले. आज ज्याप्रमाणे चेन्नई एक्स्प्रेस चित्रपटाची धूम सुरू आहे. तशीच धूम मुंबई- मद्रास पॅसेंजरने औद्योगिक, सांस्कृतिक क्षेत्रात घडली होती. त्यानिमित्ताने सोलापुरातून धावलेल्या मद्रास पॅसेंजरचा हा उजाळा. सोलापूर व मुंबई हे त्यावेळी गेट्र इंडियन पेनिसिलन रेल्वेच्या अंतर्गत होते. भारतातील मुंबई, मद्गास, दिल्ली, कोलकता ही चार प्रमुख महानगरे रेल्वे मार्गाने जोडण्याचा ब्रिटिश काळात प्रयत्न होता.

स्वातंत्र्यपूर्व कालखंडात त्याकाळी भारताची राजधानी कोलकता होती. मुंबई आणि मद्रास दोन शहरे रेल्वे मार्गाने जोडलेली नव्हती. 1856 मध्ये मुंबई -मद्रास दरम्यान रेल्वे लाइन टाकण्यात आली. त्याकाळी नॅरोगेजची लाइन होती. मालगाडी बरोबरच प्रवासी वाहतूक होत होती. प्रवासी वाहतुकीसाठी पॅसेंजर गाडीचा वापर होत होता. वाफेच्या (स्टीम) इंजिनवर ही रेल्वे धावायची. पॅसेंजर गाडीला आठ ते 10 डबे जोडलेले असायचे.