आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Maghi Piligrim : Pandharpur Reday For Welcoming To Devotee

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

माघी यात्रा : भाविकांच्या स्वागतास पंढरपूर सज्ज

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक


पंढरपूर - श्रीक्षेत्र पंढरपूरमध्ये 21 फेब्रुवारी रोजी होणा-या माघी यात्रेनिमित्त प्रशासकीय तयारी पूर्ण झाली आहे. या सोहळ्यासाठी राज्य-परराज्यातून लाखो भाविक येण्याचा अंदाज आहे. त्यांच्या सोयीसाठी 16 ते 25 फेब्रुवारीदरम्यान शहरातील व शहराबाहेरील वाहतूक मार्गातही बदल करण्यात आला आहे.

या यात्रेनिमित्त 750 हंगामी तर कायमस्वरूपी 350 असे एकूण 1100 सफाई कामगार नेमले असल्याचे पालिकेचे मुख्याधिकारी रवींद्र जाधव यांनी सांगितले. पंढरपूर बंधा-यात सध्या 32 दशलक्ष घनफूट इतका पाणीसाठी शिल्लक असून, एकादशी व दशमीदिवशी नदीपात्रात जिल्हा प्रशासनाच्या सहकार्याने थोडेफार पाणी सोडण्याबाबत प्रयत्नशील राहू. तसेच यात्रेत सहा ठिकाणी प्रथमोपचार केंद्रे कार्यान्वित केले जातील.