आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भक्तीच्या रिंगणात फडकली धर्मपताका

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर - वेळ सकाळी अकराची, सूर्य माथ्यावर येऊ लागलेला, अनवाणी पाय, मुखी हरिनाम, हाती टाळ, मृदंग सोबतीला श्रद्धेने भारलेले वातावरण, चिमुकल्यांच्या भगव्या पताका. टाळ मृदंगांच्या गजरात माऊलीच्या नामस्मरणात रंगला भक्तीचा सोहळा. निमित्त होते माघवारी पालखी प्रस्थानाच्या भव्य रिंगण सोहळ्याच्या पूर्व तयारीचे.

संभाजीराव शिंदे प्रशालेच्या प्रांगणात रविवारी सोलापुरातील वारकरी मंडळींनी 16 फेब्रुवारी रोजी होणार्‍या रिंगण सोहळ्याची पूर्व तयारी केली. या वेळी दोनशे ते तीनशे वारकरी संप्रदायातील मंडळी उपस्थित होती. सुधाकर इंगळे महाराज यांच्या मार्गदशर्नाखाली रिंगणाची पूर्व तयारी पार पडली. शुभ्र वेशातील वारकरी, भगवी पताका धारण केलेले चिमुकले, माउलीचा चाललेला भक्तीचा जागर यामुळे वातावरण भक्तिमय झाले.

सोलापूरकरांना पर्वणी
सोलापूरकरांना भक्तीचा अनुपम सोहळा अनुभवता यावा म्हणून 16 फेब्रुवारी रोजी दुपारी साडेचार वाजता होम मैदानावर अश्वाच्या भव्य गोल रिंगण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. या वेळी 43 दिंड्या उपस्थित राहणार असून, या गोल रिंगणासाठी सुमारे 15 ते 20 हजार जणांची उपस्थिती असणार आहे.