आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महा ई-सेवा केंद्राचे सर्व्हर डाउन, नागरिकांना मनस्ताप

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अकोला - गेल्या दोन ते तीन दिवसांपासून महा ई-सेवा केंद्राचे सर्व्हर डाउन असल्याने नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागत आहेत. याचा फायदा घेऊन महा इ-सेवा केंद्र, संचालक नागरिकांची आर्थिक पिळवणूक करत आहे,असा आरोप होत आहे. याकडे महसूल विभागाचे दुर्लक्ष असल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

नागरिकांच्या सेवेकरिता शासनाने महा इ-सेवा केंद्र सुरू केले आहेत. शासनाच्या सेवेच्या फायद्याऐवजी नागरिकांना मनस्तापच सहन करावा लागत आहे. विविध शासकीय दाखल्यांची विद्यार्थी व नागरिकांना गरज भासत आहे. पैसे देऊन नागरिकांना त्रास सहन करावा लागत असल्याचे चित्र महानगरात आहे. एका शासकीय आदेशानुसार सहा लाख रुपये उत्पन्न र्मयादा असलेल्या कुटुंबातील पाल्यांना शैक्षणिक सवलतीसाठी तीन वर्षांतून एकदा नॉन क्रिमीलेअर प्रमाणपत्र काढावे लागते. ही मुदत संपल्यावर परत अर्ज करावा अथवा पुन्हा मूळ अर्जासाठी आकारलेले शुल्क परत द्यावे, असे सांगण्यात येत असल्याने तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.

ऑफलाइनमुळे शासनाच्या महसुलाचे होतेय नुकसान
गेल्या दोन दिवसांपासून महा इ-सेवा केंद्राचे सर्व्हर डाउन आहे. त्यामुळे शहरातील केंद्राचे ऑफलाइन कामकाज सुरू आहे. यामुळे शासनाचा महसूल बुडत आहे. सेतू केंद्र सुरू असताना हा प्रकार कधीच झाला नव्हता. त्यामुळे सेतू केंद्र परत सुरू करण्याची मागणी होत आहे.

नागरिकांची कामे थांबली
मागील दोन दिवसांपासून महा इ-सेवा केंद्राचे सर्व्हर डाउन असल्याने नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. त्यामुळे नागरिकांची कामे थांबली आहेत. त्यामुळे यावर लवकरात लवकर उपाययोजना करण्यात यावी, अशी मागणी होत आहे.

माहिती देण्यात आली
सर्व्हर डाउन झाल्याची माहिती संबंधितांना देण्यात आली. नागरिकांची गैरसोय होऊ नये, यासाठी पर्यायी व्यवस्था करण्यात येईल. याबाबत दक्षता घेण्यात येत आहे.’’ सोहम वायाळ, उपविभागीय अधिकारी.

सर्व्हर डाउनमुळे डोकेदुखी
महा इ-सेवा केंद्रांचे सर्व्हर डाउन झाल्यामुळे गेल्या दोन दिवसांपासून प्रमाणपत्र मिळाले नाही. सर्व्हर डाउनमुळे डोकेदुखी वाढली आहे. त्यामुळे प्रशासनाने नागरिकांची अडचण समजून घ्यावी. लवकरात लवकर काहीतरी उपाययोजना करण्यात यावी.’’ राजू शर्मा, नागरिक