आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Maha State Minister Kamble Says MLA Kadam Is Gilty

दोषी आढळल्यास आमदार कदम यांना बेड्या : राज्यमंत्री कांबळे

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - अण्णाभाऊ साठे महामंडळामध्ये शासन नियम डावलून मनमानी पद्धतीने कर्जवाटप करुन ४५० कोटी रुपयांचा घोटाळा चौकशीमध्ये उघड झाला आहे. याप्रकरणी काही अधिकाऱ्यांना निलंबित केले आहे तर आणखी काहींची चौकशी सुरू अाहे. याप्रकरणात आणखी ४० अधिकारी निलंबित होतील तर काहीजण जेलमध्ये जातील. यात महामंडळाचे तत्कालीन अध्यक्ष व मोहोळचे विद्यमान आमदार रमेश कदम दोषी आढळल्यास त्यांनाही बेड्या ठाेकू, असा इशारा सामाजिक न्याय राज्यमंत्री दिलीप कांबळे यांनी बुधवारी दिला.


आजपर्यंत झालेल्या चौकशीमध्ये प्रत्येक जिल्ह्यातील महामंडळामध्ये अनेक गंभीर व अनियमित बाबी समोर आल्या आहेत. अण्णाभाऊ साठे महामंडळाचे तत्कालीन अध्यक्ष रमेश कदम व अधिकारी यांनी केलेली कामांची सीआयडी, सीबीआय व एसीबी यांच्याकडून कारवाई सुरू आहे. ही कारवाई अंितम टप्प्यात आली आहे. यामध्ये राज्यभरात ४५० कोटी रूपयांचा घोटाळा झाल्याचे रेकॉर्डवर आले आहे. यामध्ये जे दोषी आढळले आहेत, त्या १६ अधिका ऱ्यांवर कारवाई करण्यात आली आहे, आणखी ४० जणांवर लवकरच कारवाई होणार असल्याचे कांबळे यांनी सांगितले.

अनेक कर्जप्रकरणे बोगस आहेत तर अनेक ठिकाणी अपात्र लाभार्थ्यांना लाभ दिल्याचे निदर्शनास आले आहे. इतका मोठा अपहार फक्त अधिकारी करणे शक्य नसून याला सत्ताधाऱ्यांचे पाठबळ असल्याचे दिसून आले आहे. यामुळे या प्रकरणात तत्कालीन महामंडळाचे अध्यक्ष रमेश कदम यांचीही चौकशी होणार आहे. चौकशीमध्ये कदम दोषी आढल्यास त्यांना बेड्या ठोकणार असल्याचे श्री. कांबळे यांनी ठासून सांगितले.