आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सोलापुरात आजपासून शंभूराजे महानाट्य

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर- लोकमंगल प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित शिवपुत्र शंभूराजे महानाट्यास गुरुवारी जुळे सोलापुरातील हॉटेल अंबरसमोरील मैदानात सुरुवात होत आहे. तीनशे कलावंतांसह हत्ती, घोडे, उंट, बैलगाड्या, जिवंत तोफा, 18 फुटी बोटीसह दोन मजली रंगमंचावर हे महानाट्य सादर होणार आहे.

गुरुवारी सायंकाळी 6 वाजता विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते विनोद तावडे यांच्या हस्ते उद्घाटन होईल. माजी खासदार सुभाष देशमुख यांची उपस्थिती असेल. सलग सहा दिवस चालणार्‍या महानाट्याच्या शुभारंभासाठी दररोज दहा मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

छत्रपती शिवरायांच्या जीवनावर आधारित जाणता राजा हे महानाट्य शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांनी प्रेक्षकांसमोर आणले. त्यानंतर शंभूराजांच्या जीवनावर आधारित हे महानाट्य पुणे येथील शिवस्वराज्य व लोकमंगल प्रतिष्ठान यांनी आणले आहे. छत्रपती शिवरायांनंतर शंभूराजांनी सतत 12 वष्रे स्वराज्याच्या रक्षणासाठी कडवी झुंज दिली. महानाट्यासाठी शंभर बाय चाळीस रुंद व चाळीस फूट उंच असा रंगमंच तयार करण्यात आला आहे. धूळ उडू नये यासाठी संपूर्ण मैदानात मॅट टाकण्यात आली आहे. विद्यार्थ्यांसाठी तिकीट दरात सवलत देण्यात आली आहे.