आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Maharashtra Assembly Elections Latest News In Divya Marathi

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

जिल्ह्यात राष्ट्रवादीकाँग्रेस काँग्रेस आघाडीचे प्राबल्य, भाजप-सेना कमजोरच

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर- राष्ट्रवादीकाँग्रेस काँग्रेस आघाडीचे प्राबल्य असलेल्या सोलापुरात भाजप-शिवसेना कमजोर होते. चारवेळा भाजपला लोकसभेसाठी जागा मिळाली. जिल्ह्यामध्ये फक्त दोन आमदार भाजपचे आहेत.
दहा वर्षांपूर्वी बार्शी पंचायत समिती युतीकडे होती. हा एकमेव अपवाद वगळता जिल्ह्यात स्थानिक स्वराज्य संस्थेत युतीला यश मिळाले नाही. १९९५ मध्ये अक्कलकोटचे (कै.) बाबासाहेब तानवडे, विद्यमान पालकमंत्री दिलीप सोपल, (कै.) दिगंबर बागल, उत्तमप्रकाश खंदारे हे युतीचे आमदार झाले. खंदारेंना राज्यमंत्रिपद मिळाले होते. १९९९ मध्ये युती सत्तेत असताना भाजपच एकही आमदार विजयी झाला नाही. (
शहर उत्तरमधून शिवसेनेचे उत्तमप्रकाश खंदारे शहर दक्षिणमध्ये शिवशरण पाटील, १९९५ मध्ये पोटनिवडणुकीत नरसिंग मेंगजी आमदार झाले. ते यश कायम राखण्यात युतीला अपयश आले. २००८च्या जिल्हा परिषद निवडणुकीत युतीचे पाच सदस्य होते. मात्र, २०१२ मध्ये युतीचा एकही उमेदवार निवडून आला नाही. २००४ मध्ये अक्कलकोट, शहर उत्तर मतदारसंघात युतीचे फक्त दोन आमदार विजयी झाले. २००५ मध्ये दक्षिण सोलापूर तालुका विधानसभेच्या निवडणुकीत युतीला यश मिळाले होते. १९९४ मध्ये (कै.) लिंगराज वल्याळ, २००३ मध्ये पोटनिवडणुकीत प्रतापसिंह मोहिते, २००४ मध्ये सुभाष देशमुख, २०१४च्या लोकसभेच्या निवडणुकीत खासदार शरद बनसोडे विजयी झाले.