आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Maharashtra Navnirman Sena News In Marathi, Lok Sabha Election, Divya Marathi

मनसे राज्यात आक्रमक, सोलापुरात शांत

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - यूपी, बिहारमधील नागरिकांना मुंबईतून पळवून लावण्याचा मुख्य अजेंडा असलेल्या मनसेने टोलविरोधी आंदोलन करून लोकांचे लक्ष वेधले. मराठीबाणा मजबूत करण्याच्या मुद्दय़ावर राज ठाकरे यांच्या भाषणांना अलोट गर्दी झालेली दिसते. परंतु सोलापुरात शांतता दिसून येते. गेल्या आठवड्यात साजरा केलेल्या पक्षाच्या वर्धापनदिनी फळे आणि चादर वाटप या व्यतिरिक्त शहर मनसेकडून कोणताच भरगच्च कार्यक्रम झाला नाही.
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्षाच्या भूमिकेकडे सार्‍यांचे लक्ष आहे. परंतु सोलापुरात मात्र कार्यकर्ते अगदीच ‘मनसे’ कामाला लागले, असे चित्र नाही. लोकसभेसाठी उत्तम नवगिरे, प्रशांत गायकवाड, शशिकांत कांबळे, नीलेश भंडारे, उद्योगपती चाबुकस्वार, सचिन आठवले आदी नावे चर्चेत आहेत. पण उमेदवारी कोणाला मिळेल? रणनीती काय असेल? याबाबत कसलाच उत्साह दिसून येत नाही. शहराला कधी नव्हे ते दोन शहराध्यक्ष लाभले.पण त्यांचा प्रभाव दिसून येत नाही. शहरात पक्षाची ताकद असतानाही दूषित पाणी, डीसीसीवरील मोर्चा, स्थानिक प्रश्न असो अथवा टोलविरोधातील आंदोलने त्यावर मनसेची ‘खळ्ळ खटॅक’ स्टाइल म्हणावी तशी येथे दिसली नाही.
लोकसभा निवडणुकीसाठी पोलिंग व बूथ एजंट नेमणुका या व्यतिरिक्त कोणताही ठोस कार्यक्रम झालेला दिसत नाही. मागील वर्षी 22 फेब्रुवारीला झालेली राज ठाकरेंची जाहीरसभा हाच पक्षाचा शेवटचा कार्यक्रम म्हणता येईल. त्यानंतर शहरात विशेष घडलेच नाही.
जिल्हा संघटक धोत्रेंना थेट प्रश्न
मनसेचा वर्धापन दिन कधी होता?
9 मार्चला वर्धापन दिन कसा झाला?
जिल्ह्यात अनेक ठिकाणी विविध कार्यक्रम
दोन शहराध्यक्षांकडून शहरात कार्यक्रम काय काय झाले?
जिल्ह्यात झालेत, शहरात कार्यक्रम झाल्याची माहिती घेऊन सांगतो.महिला आघाडीने कार्यक्रम घेतले आहेत.
आगामी लोकसभेसाठी उमेदवार कोण?