आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Maharashtra Sahitya Parishad President Selection Yogiraj Waghmare

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

मसाप अध्यक्षपदी योगिराज वाघमारे

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर: महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या सोलापूर शाखा अध्यक्षपदी ज्येष्ठ साहित्यिक योगिराज वाघमारे यांची शुक्रवारी सायंकाळी निवड झाली. कविवर्य डॉ. लक्ष्मीनारायण बोल्ली यांनी अध्यक्षपदाचा राजीनामा दिला. तो मंजूर करून नव्या अध्यक्षांची निवड करण्याबाबत कार्यकारिणीची बैठक झाली. तीत र्शी. वाघमारे यांची एकमताने निवड झाली.
शाखेतील काही पदाधिकार्‍यांकडून अपमानास्पद वागणूक मिळाल्याने डॉ. बोल्ली यांनी अध्यक्षपदाचा राजीनामा दिला. मनधरणी केल्यानंतरही त्यांनी जबाबदारीतून मुक्त करण्याची विनंती केली. त्यामुळे त्यांचा राजीनामा मंजूर झाला. अध्यक्षपदासाठी र्शी. वाघमारे यांच्या नावावर एकमत झाले. त्यामुळे वादावर पडदा टाकून मतभेद विसरून काम करण्याचे आवाहन ज्येष्ठ कवी दत्ता हलसगीकर यांनी केले. त्यांना अँड. जे. जे. कुलकर्णी, पद्माकर कुलकर्णी यांनी प्रतिसाद दिला. खेळीमेळीच्या वातावरणात ही बैठक झाली. या वेळी कार्याध्यक्ष प्रा. डॉ. सुहास पुजारी, कवी माधव पवार, मारुती कटकधोंड, राजेंद्र भोसले आदी उपस्थित होते.
यापुढे माध्यमांशी फक्त दोघेच बोलणार
कार्यकारिणीच्या बैठकीत अध्यक्ष वाघमारे आणि कार्याध्यक्ष डॉ. सुहास पुजारी हे दोघेच बोलतील, असे ठरवण्यात आले आहे. परिषदेच्या कामासंदर्भात एकवाक्यता राहण्यासाठी हा निर्णय झाला. साहित्यिक म्हणून समाजापुढे जाताना मतभेद असू नयेत हेही दाखवून द्यायचे आहे, अशी भावना अध्यक्ष वाघमारे यांनी व्यक्त केली.