आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Maharashtra St Corrporation President Sudhakar Paricharak Comment On Rangaana At Solapur

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

रंगाअण्णा हे जनतेचे संपादक; सुधाकर परिचारक यांचे प्रतिपादन

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर: रंगाअण्णा वैद्य यांनी सर्वसामान्य जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी सातत्याने प्रयत्न केले. सामाजिक विचारांची जोड देऊन पत्रकारितेत अण्णांनी एक नवीन प्रवाह निर्माण केला. त्यामुळे रंगाअण्णा हे फक्त वृत्तपत्राचे संपादक नव्हते तर ते जनतेचे संपादक होते, असे प्रतिपादन एसटी महामंडळाचे अध्यक्ष सुधाकर परिचारक यांनी केले.
हुतात्मा स्मृती मंदिर येथे गांधी फोरमच्या वतीने रंगाअण्णा वैद्य यांच्या स्मृितप्रीत्यर्थ देण्यात येणार्‍या आदर्श समाजसेवक पुरस्कारांचे वितरण शुक्रवारी परिचारक यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. आमदार प्रणिती शिंदे, माजी आमदार निर्मला ठोकळ, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा डॉ. निशिगंधा माळी, आनंदराव देवकते, फोरमचे राज्य अध्यक्ष पुरुषोत्तम बलदवा आदी उपस्थित होते. स्मृतिचिन्ह, शाल, र्शीफळ असे पुरस्काराचे स्वरूप आहे.परिचारक म्हणाले, की रंगाअण्णांनी सोलापुरात पत्रकारितेची चळवळ उभी केली. त्यांना सामाजिक, धार्मिक या सर्व प्रश्नांची जाण असल्याने लोकांचे प्रश्न आपल्या लेखणीच्या माध्यमातून मांडत असत. त्यामुळे त्यांना ध्येयवादी पत्रकार म्हणून ओळखले जात होते. सोलापूर शहरात सध्या पाण्याचा प्रश्न भेडसावत आहे. सीना-कोळेगावच्या पाण्याचा प्रश्न चिघळला आहे. पाणी सोडले जाते पण मध्येच ते कुठे गायब होते, ते कळतच नाही. त्यामुळे फक्त विरोधाला विरोध म्हणून राजकारण करण्यापेक्षा जनतेच्या भल्यासाठी राजकारण केले पाहिजे. असे मत ठोकळ यांनी आपल्या भाषणात मांडले.