आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सीबीएसई पॅटर्ननुसार सामाजिक शास्त्रे

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर - ‘विद्यार्थी केंद्रित शिक्षण’ या शैक्षणिक धोरणानुसार महाराष्ट्र राज्य पाठय़पुस्तक महामंडळाने दहावीच्या इतिहास व राज्यशास्त्र विषयांच्या पुस्तकातील अभ्यासक्रमाची रचना केली आहे. ही नवी रचना विद्यार्थ्यांना भविष्यात स्पर्धात्मक परीक्षेसाठी उपयोगी पडावी, याची काळजी घेण्यात आली आहे. अर्थात केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या (सीबीएसी) अभ्यासक्रमानुसार याची रचना आहे.

महामंडळाने जून 2013 पासून दहावीच्या गणित व विज्ञान वगळून मराठी, हिंदी, संस्कृत, इंग्रजी व समाजशास्त्र विषयांच्या अभ्यासक्रमात आमूलाग्र बदल केला आहे. ज्ञानाच्या आधारे भविष्यातील जीवनमार्ग शोधण्याची क्षमता व आधुनिक काळातील समस्यांना सहजपणे सामोरे जाता यावे, हा उद्देश अभ्यासक्रम बदलण्यामागे आहे. उच्च शिक्षणाच्या अभ्यासक्रमाच्या धर्तीवर पुस्तकात इतिहासविषयक नवीन कल्पना, जागतिकीकरण, महिलांचा सहभाग, पर्यावरणाची गरज, मानवतावाद, इतिहासविषयक बदललेली दृष्टी विचारात घेऊन पुस्तकाची मांडणी आहे.

40 टक्के गुण गरजेचे
दहावीत विज्ञान विषयात 40 टक्के गुण मिळवणार्‍या विद्यार्थ्यालाच शैक्षणिक वर्ष 2013- 14 मध्ये अकरावी विज्ञान शाखेत प्रवेश देण्याचा निर्णय माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने घेतला आहे.

स्पर्धा परीक्षेसाठी उपयुक्त
सामाजिक शास्त्रे अभ्यासक्रमासाठी सीबीएसई पॅटर्न असून, जुन्या अभ्यासक्रमात साम्राज्यवादाची नुसती व्याख्या होती. नव्यात सखोल विश्लेषण आहे. सर्व प्रकरणे सविस्तर मांडली असल्याने विद्यार्थ्यांच्या सामान्यज्ञानात वाढ होऊन भविष्यात स्पर्धात्मक परीक्षेचा अभ्यास करताना निश्चित उपयोगी पडेल.’’ संजय सावंत, शिक्षक, सामाजिक शास्त्रे