आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Maharashtra State Directorate Of Cultural Organised State Drama Competition

५४ व्या राज्य नाट्य स्पर्धेचे गुरुवारी बिगुल वाजणार

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - महाराष्ट्र राज्य सांस्कृतिक संचालनालयाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या स्पर्धेचे ५४ व्या राज्य नाट्य स्पर्धेचे गुरुवार (दि. १३) पासून बार्शीच्या यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात बिगुल वाजणार आहे. गुरुवारी स्पर्धेचे उद्घाटन होणार असून याच दिवशी आराधना विश्वस्त मंडळ संस्थेचे दास्ता हे नाटक सादर होणार आहे.
दि. १४ रोजी बनशंकरी बहुउद्देशीय संस्थेचे एक झुंज वाऱ्याशी, दि. १५ रोजी महापात्रा हे भीमज्योत महिला सुधारणा मंडळ या संस्थेचे नाटक सादर होणार आहे.

दि. १६ रोजी गोष्ट जन्मांतरीची, कुर्डुवाडी बिरादरी, दि. १७ रोजी बळी राजा तू का उपाशी? लोक प्रबोधन विविध कलागुुण प्रदर्शन कलामंच उस्मानाबाद, दि. १८ रोजी स्वींग हे पंचमवेद सोलापूर संस्थेचे नाटक सादर होणार आहे तर १९ रोजी समाराधना चौथा स्तंंभ हे नाटक तर दि. २० नोव्हेंबर रोजी श्रृती मंिदर नाट्य संस्थेचे रातराणी हा प्रयोग, दि.२१ रोजी सुस्नेह नाट्य संस्थेचा खंडहर हा प्रयोग सादर होणार आहे.

दि. २२ रोजी लेक गुणाची चिंता लग्नाची हे नाटक स्वप्नील स्वप्ना लोककला विकास मंडळ, मानेगाव यांचा प्रयेाग सादर होणार आहे तर दि. २३ रोजी इस्कॅलॅवो हे विकास वाचनालय, सोलापूर संस्थेचे नाटक सादर होणार आहे. दि २४ नोव्हेंबर रोजी सम्राट अशोक झंकार सांस्कृितक मंच सोलापूर या संस्थेचे नाटक सादर होणार आहे.

नाट्यप्रयोग सायंकाळी वाजता होणार आहेत. स्पर्धेचा आस्वाद घ्यावा असे आवाहन समन्वयक रामचंद्र इकारे यांनी केले आहे.